गरम मसाला हा प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतोच, कारण गरम मसाला हा भाजीमध्ये आणि वरणामध्ये टाकल्यास त्या भाजीची आणि वरणाची चव खुप वाढते आणि जेवणात अजून रंजत येते. बाजारात अनेक प्रकारचे मसाले मिळतात परंतु; ते मसाले वापरल्यास बर्याच वेळी पोट जड पडणे, मसाल्याचेच ढेकर येणे किंवा छातीत दाह होणे असे प्रकार होऊ शकतात. बाजारात मिळणार्या गरम मसाल्याने अशा समस्या तर उद्भवू शकतातच शिवाय हा मसाला जास्त दिवस देखील टिकण्याची शक्यता कमी असते , म्हणून गरम मसाला घरीच बनवा. ही घ्या सोपी रेसिपी आणि अचूक प्रमाण..
पाव किलो गरम मसाल्याचे साहित्य
- ४ टेबल स्पून धनेइंदोरी
- ४ टेबलस्पून मिरं
- ६ काड्या मध्यम आकाराचे दालचिनी
- १ टेबल स्पून लवंग
- ५ पाने तेजपान
- १ टेबलस्पून शहाजिरं
- ४ मसाला वेलची
- १ जावेत्री
- २ चक़ी फूल
- ३ टेबलस्पून जिरं
- १ टेबल स्पून मीठ
- १/२ जायफळ
पाव किलो गरम मसाल्याची कृती
स्टेप १
गरम मसाला बनविण्यासाठी सर्व मसाले स्वच्छ साफ करून घ्यावेत आणि वर सांगितलेल्या प्रमाण मध्ये घ्यावेत. तुम्हाला जेवढा जास्त दिवसांसाठी मसाला करायचा आहे, त्याप्रमाणे हे साहित्याचे प्रमाण तुम्ही वाढवु शकता आणि गरम मसाला बनवु शकता.
स्टेप २
मोठे मोठे जे साबुत जिन्नस आहेत जसे की सुंठ, दालचिनी, जायफळ, तमालपत्र हे जिन्नस थेाडेसे बारीक करून घ्या .सर्व पदार्थ साफ करून झाल्यानंतर एक दिवस कडक उन्हात वाळू द्यावे जेणे करून मसाला छान भाजला जाईल आणि बारीक देखील होईल तसेच पाणी किंवा ओलसर न राहिल्याने मसाला जास्त दिवस टिकेन. त्यासोबत लालमिरची सुद्धा उन्हात वाळवण्यास ठेवावी.
स्टेप ३
सर्व जिन्नस टाका आणि थोडेसे तेल टाकून कमी गॅसवर चांगले भाजुन घ्या. सर्व मसाले एकत्र भाजले तरी चालेल किंवा थोडे थोडे मसाले घेऊन भाजले तरी चालेल जसे तुम्हाला सोयीस्कर असेल तसे तुम्ही भाजुन घेऊ शकता.
स्टेप ४
सर्व भाजलेले जिन्नस थंड करून घ्या. आता लाल मिरची थोडे थोडे तेल टाकून भाजून घ्यावी. छान वास येई पर्यंत आणि खरपूस अशी भाजावी. सर्व जिन्नस थंड झाल्यावर जे मोठे मोठे जिन्नस आहेत जे की दालचिनी, सुंठ, विलायची, चक्रफुल हे मिक्सरच्या भांडयात टाकुन वाटुन घ्या . लक्षात ठेवा चांगले बारीक करून घ्या अजिबात जाडसर ठेऊ नका.
स्टेप ५
त्यानंतर मग सर्व जिन्नस एका पातेल्यात काढा आणि चांगले मिसळुन घ्या आणि परत एकदा मिक्सरच्या भांडयात टाकुन फिरवुन घ्या. जेणेकरून सर्व जिन्नस एकजीव होवुन पुर्णपणे मिळुन येतील आणि सर्व एकत्रित होतील.
स्टेप ६
त्यानंतर परत हे मसाले चांगल्याप्रकारे मिक्सरवरून एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ मिसळावे. मीठ थोडे जास्त टाकले तरी चालेल, कारण मीठ मुळे मसाला जास्त दिवस टिकतो , त्यास जाळे किंवा किडे आळि होत नाही , परंतु गरम मसाल्यात मीठ जास्त टाकले असेन तर भाजीत मीठ कमी टाकावे जेणे करून खारट होणार नाही.
स्टेप ७
मसाला हा जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही हा मसाला घरी मिक्सर मधून बारीक न करता , बाहेरून गिरणीतुन किंवा मिरची कांडप यंत्रातून सुध्दा कांडुन आणू शकतात.
स्टेप ८
या मसाल्यामधील एक जिन्नस जायफळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकु शकता आणि जायफळ भाजतांना जास्त न भाजता थोडेसेच गरम करून घ्या आणि नंतर मिक्सरमध्ये टाकुन घ्या.
हेही वाचा >> नवरात्रीचे उपवास करताय का? मग बाजरी उत्तपम ही रेसिपी नक्की ट्राय करा…
हवा बंद डब्यात भरून ठेवावे. वर्षभरासाठी हा घरच्याघरी मसाला नक्की करा.