Ragi Biscuits: नाचणी आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते. नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. आज आम्ही तुम्हाला नाचणीचे बिस्कीट कसे तयार करावे हे सांगणार आहोत.
नाचणीचे बिस्कीट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
- ५ वाटी नाचणी पीठ
- ३ वाटी पिठी साखर
- ३ वाटी तूप
- २ छोटे चमचे बेकिंग पावडर
- मीठ चवीनुसार
नाचणीचे बिस्कीट बनवण्याची कृती :
हेही वाचा: घरच्या घरी फक्त काही मिनिटांत तुमच्या बाळासाठी बनवा नाचणी सत्व; वाचा साहित्य आणि कृती
- सर्वात आधी नाचणी पीठ आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या.
- आता त्यामध्ये तूप टाकून हे मिश्रण चांगले एकजीव करा.
- नंतर त्यामध्ये पिठी साखर, दूध टाकून त्याचा घट्ट गोळा बनवून घ्या.
- आता तो गोळा अर्धा तास ठेवा.
- त्यानंतर जाड लाटून वाटीच्या साहय्याने त्याचे काप पाडा.
- आता त्याला ओव्हनमध्ये १८० डि.सें. वर २० मिनिटे बेक करण्यासाठी ठेवा.
- अशाप्रकारे तयार नाचणीच्या बिस्किटाचा आस्वाद घ्या.