चायनीज पदार्थांना देशी तडका देत हल्ली अनेकजण वेगवेगळे पदार्थ ट्राय करुन पाहतात. यातील नूडल्स हा चायनीज पदार्थ अनेकांच्या आवडीचा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत नूडल्स आवडीने खातात. पण हे नूडल्स मैद्याच्या पीठापासून बनवत असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते अपायकारक ठरतात. अशावेळी तुम्ही मैदा, गव्हाचं पीठ न वापरता घरच्या घरी ज्वारीच्या पीठापासून चक्क चटपटीत नूडल्स बनवू शकता. हे नूडल्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर फायदेशीर आहेच शिवाय लहान मुलांसाठीही पौष्टीक आहेत. यासाठी लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातून आम्ही तुम्हाला ज्वारीचे नूडल्स कसे बनवायचे याची रेसिपी घेऊन आले आहोत.

ज्वारीचे नूडल्स बनवण्याचे साहित्य

१ वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी बारीक चिरलेला कोबी, १ वाटी बारीक चिरलेला पातीचा कांदा, १ वाटी बारीक गाजर, १ वाटी भोपळी मिरचीचे काप, ८- १० लसूण पाकळ्या, १ चमचा बारीक कापलेले आले, १ चमचा सोयासॉस, १ चमचा टोमॅटो सॉस, १ चमचा चिली सॉस, अर्धा चमचा मिरपूड, १ चमचा तेल, मीठ, पाणी.

Modak Recipe Modak without Mold Talniche modak recipe in marathi
बाप्पा तुला गोड गोड मोदक घे! बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटात करा तळणीचे मोदक; कमी वेळात नैवेद्य तयार
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
tasty wheat flour modak
Modak Recipe: एक वाटी गव्हाच्या पीठात झटपट बनवा उकडीचे मोदक; तांदळाच्या मोदकांपेक्षा लागतील भारी
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
amazing Coconut Milk benefits for skin
त्वचा, केस आणि आरोग्यासाठी नारळाच्या दुधाचे ५ आश्चर्यकारक फायदे; घरच्या घरी कसे बनवावे नारळाचे दूध?
Seat Belt in Car
कारमध्ये सीट बेल्ट लावणे का आवश्यक आहे? तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ‘हा’ Video एकदा पाहाच, तुम्हालाही समजेल!
Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
non-vegetarian food, lunch boxes, food safety, danger zone temperature, bacteria, foodborne illnesses, Dt. Umang Malhotra, tiffin safety, Salmonella, food storage
टिफिनमध्ये मांसाहारी पदार्थ घेऊन जाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

ज्वारीचे नूडल्स बनवण्याची कृती

ज्वारीच्या नूडल्स करण्यासाठी प्रथम वाटीभर पाणी उकळत ठेवावे. त्यात ज्वारीचे पीठ व चवीपुरते मीठ घालून त्याची उकड काढावी. उकडीपासून चाळणीवर नूडल्स काढाव्या. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात क्रमाने आले, लसूण, कांदा, गाजर, भोपळी मिरची हे सर्व घालून परतून घ्यावे. त्यावर सर्व प्रकारचे सॉस घालावेत. चवीसाठी मीठ व मिरपूड घालणे. त्यात वाफवलेल्या नूडल्स घालून हलक्या हाताने मिक्स कराव्यात. अशाप्रकारे ज्वारीच्या नूडल्स आस्वादासाठी तयार.

मैद्याच्या पिठापासून बनवलेले नूडल्स नियमित खाणे हानिकारक ठरू शकते, अशावेळी तुम्ही ज्वारीच्या पीठापासून बनवलेले नूडल्स खाऊन निरोगी राहू शकता. यात वाढत्या मधुमेह आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी हे नूडल्स खूप पौष्टीक ठरू शकतात.