Spicy Mushroom Bhaji: मशरूमच्या चवीमुळे अनेकांना मशरूमपासून बनविलेले पदार्थ खायला खूप आवडतात. मशरूम खाणं आपल्या आरोग्यासाठीही खूप पौष्टिक मानलं जातं. मशरूममध्ये जीवनसत्त्वं, खनिजं व अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदतदेखील होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मशरूमची भाजी कशी बनवायची हे सांगणार आहोत. जाणून घ्या साहित्य आणि कृती…

मशरूमची भाजी बनविण्यासाठी साहित्य:

१. १०० ग्रॅम मशरूम
२. ३ कांदे
३. २ टोमॅटो बारीक चिरलेले
४. ७-८ लसूण पाकळ्या
५. आल्याचा लहान तुकडा
६. ३-४ लाल मिरच्या
७. काळी मिरी, लवंग, तमालपत्र
८. १/२ चमचा
९. २ चमचा लाल तिखट
१०. मीठ चवीनुसार
११. कोथिंबीर बारीक चिरून
१२. तेल आवश्यकतेनुसार

gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच
Lucky bamboo plant care
बांबूचे रोप सुकत चाललयं? ‘या’ सोप्या पद्धतीने घ्या काळजी
What are nutritional powerhouses for liver
Nutritional Powerhouses For Liver : क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? यकृतासाठी होतो मोठा फायदा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात…
Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Bad Breath Smell Home Remedies
तोंडातून येणारी दुर्गंधी काही सेकंदांत होईल दूर! फक्त करून पाहा ‘हा’ सोपा उपाय; मिळेल ताजेतवानेपणाचा अनुभव
Nutritionist recommends having black cardamom when you feel extreme cold
हिवाळ्यात खूप जास्त थंडी जाणवत असेल तर काळी वेलची चघळा! पोषणतज्ज्ञांनी दिला सल्ला, जाणून घ्या कारण….

मशरूमची भाजी बनविण्याची कृती:

१. सर्वप्रथम मशरूमचे बारीक काप करून घ्या. ते स्वच्छ धुऊन घ्या.

२. आता कढईत तेल गरम करून, त्यात कांद्याचे तुकडे, हिरवी मिरची व आल्याचे तुकडे टाका. हे सर्व चांगले परतून घ्या.

३. एक मिनीट भाजल्यानंतर गॅस बंद करून, मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. थंड झाल्यावर त्याची बारीक पेस्ट बनवा.

४. आता कढईत पुन्हा तेल घाला आणि तेलात काळी मिरी, तमालपत्र, लवंगा घाला. हा सर्व खडा मसाला नीट भाजल्यानंतर त्यात चिरलेले मशरूमदेखील भाजून घ्या.

हेही वाचा: पावसाळ्यात प्या गरमागरम काळ्या हरभऱ्याचे सूप; पटकन नोट करा साहित्य अन् कृती

५. आता त्यात तयार केलेला मसाला, चिरलेले टोमॅटो, हळद, मीठ, लाल तिखट घालून सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.

६. त्यानंतर या मिश्रणात थोडे पाणी घालून, ते झाकून ठेवा. १०-१५ मिनिटांपर्यंत ग्रेव्ही घट्ट होईल.

७. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून, गरमा गरम मशरूमची भाजी सर्व्ह करा.

Story img Loader