दीपा पाटील
साहित्य
आणखी वाचा
२ चिकन ब्रेस्ट, अर्धा कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, १ चमचा बेकिंग पावडर, २ चमचे तीळ, तेल, मीठ चवीपुरते.
सॉससाठी – अर्धा कप टोमॅटो केचप, २ चमचे साखर, ३ चमचे मध, ३ चमचे पाणी.
कृती
सॉसचे साहित्य (मध, केचप, साखर, पाणी) एकत्र करून घ्यावे.
चिकनचे चौकोनी तुकडे करून घ्यावे. मैदा, कॉर्नफ्लोअर, बेकिंग पावडर, मीठ एकत्र करून त्यात थोडे पाणी घालावे. याचे भजीप्रमाणे सरसरीत पीठ भिजवावे. त्यात चिकनचे तुकडे बुडवून ते लालसर रंगावर तळून घ्यावेत. एका पॅनमध्ये तयार केलेला सॉस ओतून थोडा शिजवून घ्यावा. आता यामध्ये तळलेले चिकनचे तुकडे घालून ते छान मिसळून घ्यावे. लगेच गॅस बंद करावा. आता यावर थोडे भाजलेले तीळ घातले की तयार झाले हनी चिकन.