Kairichi Kadhi Recipe: तुम्हाला कढी आवडते का? आवडतं असेल तर तुमच्यासाठी आम्ही खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी खास यासाठी आहे की ही कढी कैरीपासून तयार केली जाणार आहे. कारण सध्या उन्हाळा सुरू आहे. या काळात तुम्हाला कैरी सहज उपलब्ध होऊ शकते. कैरीचे लोणचं खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही कैरीपासून तयार केली जाणारी हटके रेसिपी एकदा नक्की बनवा. नेहमीच्या कढी करण्याच्या पद्धतीपेक्षी ही कढी तयार करण्याची रेसिपी अगदी वेगळी आहे आहे. दही आणि बेसन वापरून तयार केल्या जाणाऱ्या कढीपेक्षा या कढीची चव देखील वेगळी आहे. कैरीपासून तयार केलेल्या कढीमध्ये भजी टाकले जात नाही तर कैरीच्या खुल्या (एक प्रकारचे आमसूल) टाकले जाते. या कढीची चव अप्रतिम आहे तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी
कैरीची कढी रेसिपी
साहित्य
साल काढलेल्या ४ कैऱ्या
२ मोठे चमचा तेल
१ मोठे चमचा मोहरी
२०-३० कढीपत्ता
२-३ लाल मिर्ची
८-१० काळे मिरी
1 कप किसलेला कांदा
३/4 टी स्पून गरम मसाला
चवीनुसार मीठ
चवीनुसार साखर
१ कप नारळाचे दूध
सजावटीसाठी आलं
सजवाटीसाठी कोथिंबिर
हेही वाचा- स्वयंपाक बिघडल्यास कसा वापरावा बटाटा! अन्न वाया जाऊ नये म्हणून पाच सोपे उपाय
कृती
कच्च्या कैरीची कढी तयार करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात पाणी आणि कैरी टाकून शिजवून घ्या. त्यानंतर कैरीला द्रव स्वरुपात करण्यासाठी त्यामध्ये ४ कप पाणी टाकल्यानंतर कोथिंबीर, गरम मसाला, मीठ आणि साखर टाकून व्यवस्थित मिसळा. आता एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी कढीपत्ता, लाल मिर्ची आणि काळे मिरी टाकून चांगलं परतून घ्या. जेव्हा मोहरी तडतडू लागेल तेव्हा त्यामध्ये कांदा टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यानंतर कढईत कैरीचे तयार मिश्रण टाकून उकळी आल्यानंतर ५ मिंनिटे मंद आचेवर शिजू द्या. त्यानंतर त्यामध्ये नारळाचे दूध टाकून मंद आचेवर २ मिनिटांनी परतून घ्या.कोथिंबरी टाकून सजवा.