गोड आणि खारी शंकरपाळीमध्ये खारी शंकरपाळी अनेकांना आवडतात. अनेकजण स्नॅक्स म्हणून हा पदार्थ खातात. अगदी झटपट होणारी खारी शंकरपाळीची रेसिपी तुम्ही केव्हाही बनवू शकतात पण खारी शंकरपाळी कुरकुरीत का बनत नाही, अशी अनेकांची तक्रार असते पण टेन्शन घेऊ नका. ही रेसिपी ट्राय करुन तुम्ही खारी शंकरपाळी कुरकुरीत आणि टेस्टी बनवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :-

  • मैदा
  • जिरेपूड
  • मीठ
  • डालडा

हेही वाचा : Kandyachya Paticha Jhunka : कांद्याच्या पातीचा झणझणीत झुणका खाल्ला का? ही सोपी रेसिपी ट्राय करा

कृती

  • सुरुवातीला मैदा घ्या.
  • त्यात जिरेपूड, मीठ व डालडाचे मोहन एकत्र करुन टाका आणि पीठ घट्ट भिजवा.
  • या पीठाला १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा
  • त्यानंतर या पिठाची जाडसर पोळी लाटावी आणि शंकरपाळ्याच्या आकाराचे तुकडे करावे.
  • मंद आचेवर शंकरपाळे तळावे.
  • हे शंकरपाळे अतिशय कुरकूरीत आणि चवीला पण छान लागतात.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to crispy khari shankarpali recipe food news foodie snacks recipe ndj
Show comments