सध्या अनेकांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याचे डॉक्टर सांगतात. अशावेळी आपण लगेच औषध ,गोळ्या सुरु करतो. जेणेकरून, त्याचा रक्त वाढीसाठी फायदा होईल. अनेक वेळा हेल्दी डाएट घेतल्यानंतरही काही लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. दरम्यान आता रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणत्याही औषध ,गोळ्या घेण्याची गरज नाही. कारण, आज आम्ही तुमच्यासाठी असा सरबत घेऊन आलोय जो उन्हाळ्यात शरीरासाठीसुद्धा उपयुक्त असेल आणि शरीरातील लोहाचे प्रमाण देखील वाढवेल. त्यामुळे कोणतीही बाहेरची औषध न खाता पिऊन बघा घरीच केलेला लोहयुक्त सरबत.

लोहयुक्त सरबत बनविण्यासाठी लागणारे साहित्य –

  • एक स्वच्छ धुतलेले डाळींब
  • एक बीट (सोलून घेणे)
  • गाजर
  • खजूर ५ ते ६

लोहयुक्त सरबत बनविण्याची कृती –

बीटरूटलाही लोहाचा उत्तम स्रोत मानला जातो. एका बाउलमध्ये डाळींब सोलून त्याचे दाणे काढून घ्यावे. त्यात बीट आणि गाजराचे लहान लहान तुकडे करून हे सर्व एकत्र करून घ्यावे. एकत्र केलेलं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात ५ ते ६ खजूर घालून मिक्सरमध्ये हे मिश्रण बारीक करून घ्यावे. बारीक झालेले हे मिश्रण एक गाळणी घेऊन बाउलमध्ये गाळून घेऊन ग्लासमध्ये ओतावे. अशाप्रकारे तयार झाला आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असा लोहयुक्त सरबत.  हे प्यायल्याने शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात. यासोबतच ऑक्सिजनचा पुरवठाही चांगला होऊ लागतो.

Ghee tea benefits
खरंच तूपयुक्त कॉफीप्रमाणे तूपयुक्त चहा आहे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या, तुपाच्या चहाचे फायदे
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
Fresh ginger vs dried ginger: Which is better for your health?
ताजे आले की वाळलेले आले? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर; जाणून घ्या कोणते आले वापरायचे?
Seat Belt in Car
कारमध्ये सीट बेल्ट लावणे का आवश्यक आहे? तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ‘हा’ Video एकदा पाहाच, तुम्हालाही समजेल!
banana diet weight loss
रोज रोज केळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकते? जाणून घ्या अन् गोंधळ दूर करा

हेही वाचा – आता डायबिटीज रुग्णही केक खाऊ शकतात! नाचणीचा केक चवीसोबत आरोग्यदायीही, नोट करा रेसिपी

रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी हिमोग्लोबिन खूप महत्वाचे आहे. हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी लोहयुक्त आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. हे एक खनिज आहे, म्हणून ते रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करू शकते. तसेच लोहयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. एवढेच नाही तर याद्वारे शरीराचे तापमानही नियंत्रित करता येते. रक्त हे आपल्या शरीरात खूप महत्त्वाचे असते.त्याशिवाय आपण जगू शकत नाही.यासाठी आपण काळजी घेणे गरजेचे आहे.