फळं, भाज्या कच्च्या खाव्या हे आपण नेहमीच ऐकत असतो. त्यामुळे कधी तरी आई सुद्धा जेवताना ताटात काकडी, बिट, गाजराचे तुकडे ठेवते. पण, सगळ्यांना फळं, भाज्या कच्च्या खायला आवडत नाही. आपल्यातील बरेच जण काकडी, तर काही जण बिट खात नाही. पण, कोशिंबीर खायला मात्र सगळ्यांना आवडते. पुलाव असेल किंवा बिर्याणी कोशिंबीर हा पदार्थ नेहमीच आवर्जून ताटात दिसतो. कोशिंबिरीच्या चवीत वेगळेपणा आणण्यासाठी फळांबरोबर भाज्या, पालेभाज्या, कंदमुळे यांचा समावेश करता येऊ शकतो. तसेच जर तुम्हाला कोशिंबिरीला थोडा मॉडर्न रूप द्यायचं असेल तर तुम्ही या इन्स्टाग्राम युजरने सांगितलेली ही अनोखी कोशिंबीर नक्की करून पाहू शकता.
सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम ॲपवर @iampurvishah या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. युजरने ‘कैरीची कोशिंबीर’ कशी बनवायची हे दाखवलं आहे. ही अनोखी कोशिंबीर बनवण्यासाठी काय साहित्य लागेल चला पाहू…
साहित्य :
कच्चा आंबा (कैरी), गाजर, काकडी, टोमॅटो, कांदा, शेंगदाणे, लाल/हिरवी मिरची, तिखट मसाला , लिंबाचा रस, काळे मीठ व कोथिंबीर.
हेही वाचा…चविष्ट अन् झटपट होणारी ‘शेपूची पातळ भाजी’; लगेच नोट करा रेसिपी
व्हिडीओ नक्की बघा…
कृती :
सगळ्यात पहिला एका बाऊलमध्ये कैरीचे उभे बारीक काप करून घ्या. त्यानंतर त्यात गाजर, काकडी, टोमॅटो, कांदा हिरवी किंवा लाल मिरचीचे छोटे तुकडे, कोथिंबीर, शेंगदाण्याचे बारीक तुकडे , लाल तिखट, काळे मीठ, मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. नंतर वरून थोडासा लिंबाचा रस घाला व मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या. अशाप्रकारे तुमची ‘कैरीची कोशिंबीर’ तयार.