Homemade Potato Chips: बटाट्याचे वेफर्स खायला अनेकांना आवडतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण ते आवडीने खातात. उपवासाला देखील बटाट्याचे वेफर्स खाल्ले जातात. अनेकजण बाजारातून वेफर्स विकत आणतात. हे वेफर्स महाग देखील असतात तसंच ते कशाप्रकारे बनवले गेले आहेत याची आपल्याला माहिती नसते. तर आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी वेफर्स कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

फार पूर्वी तुम्ही घरी बनवलेले बटाट्याचे वेफर्स खाल्ले असतील. हल्ली फार कमी ठिकाणी असे वेफर्स खायला मिळतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या सोप्या वेफर्सची रेसिपी शेअर करणार आहोत. हे वेफर्स तुमच्या रेडीमेड वेफर्ससारखे लागणार नाहीत. पण विश्वास ठेवा हे अधिक चविष्ट असतात.

बटाट्याचे वेफर्स साहित्य-

पातळ सालीचे बटाटे घ्या (मार्च, एप्रिल दरम्यान अशा प्रकारचे बटाटे बाजारात जास्त मिळतात),

बटाट्याचे वेफर्स कृती-

१. बटाट्यांची साल काढून घ्या. पीलरच्या मदतीने सालं काढल्यास उत्तम. सालं काढलेले बटाटे तुम्ही लगेचच पाण्यात घाला. नाहीतर बटाटे काळे पडतात.

२. तुम्हाला आवडत असलेल्या डिझाईनमध्ये बटाट्याचे चीप्स काढून घ्या. तयार चीप्स तुम्हाला पाण्यातच ठेवायचे आहे.

३. बटाट्यामध्ये स्टार्ज असतो त्यामुळे तुम्हाला दोन ते तीन पाण्यातून बटाटे काढायचे आहेत.

४. एका भांडयात पाणी घेऊन तुम्हाला त्यात तुरटी फिरवायची आहे. त्यात बटाटयाचे काप तुम्हाला रात्रभर ठेवायचे आहे.

५. पाण्यातून काढल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ते धुवून घ्यायचे आहेत. तुम्हाला एक भांडे पाणी गरम करायला ठेवायचे त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला बटाट्याचे चीप्स शिजायला ठेवायचे आहे. एक उकळी येईपर्यंत ते चांगले शिजवायचे आहेत. तुम्हाला चीप्स पारदर्शक झालेले दिसतील.

६. आता चीप्स तयार झाले हे तुम्हाला कळत नसेल तर चिप्स हातात घेऊन थोडे वाकवून पाहा. जर ते तुटले नाही म्हणजे ते तयार आहेत. जर तुटले तर ते जास्त शिजले आहेत. या रेसिपीसाठी जास्त शिजलेले चीप्स आपल्याला नको.

हेही वाचा >> रवा न भिजवता, चीक न पाडता बनवा झटपट चौपट फुलणारी रवा कुरडई; जाणून घ्या कृती

७. स्ट्रेनरमधून पाणी काढून एका स्वच्छ चादरीवर चीप्स ठेवून घ्यायचे आहेत. थोड्यावेळानंतर तुम्ही हे चीप्स कधीही तळून खाऊ शकता.

Story img Loader