[content_full]

कांदा आणि बटाटा अगदी हमरीतुमरीवर आले होते. आपण एकाच घरात, अगदी शेजारी शेजारी राहत असलो, तरी आपल्यात मूलभूत बरेच फरक आहेत, असा दोघांचा दावा होता. आज कांद्यानं खुसपट काढलं होतं. “उगा किंमतीवर घसरू नगंस. म्या किमतीत आसन तुझ्यापरीस कमी, पण स्वैपाकात आपल्यालाच जास्त भाव मिळतोय! काय काय घरांत तर आपल्या हजेरीबिगर पान हालत न्हाई!“ कांदा शेंडी ताठ करून सांगत होता. “ह्यॅ! तू एकटा काहीच करू शकत नाहीस. पण मी एकटा असलो, तरी भाजी म्हणून उपयोगी पडतो, कधी पौष्टिक म्हणून कामाला येतो, कधी रसभाजी मिक्स करण्यासाठी मध्यस्थ म्हणून माझा उपयोग केला जातो!“ सांगताना बटाट्याचा ऊर अभिमानानं भरून आला होता. “आरं, कितीबी झालं, तरी तू पडलास परमुलखाचा. म्या ह्या मातीतला अस्सल रांगडा गडी हाय! गावरान संस्कृतीचं परतीक मानलं जातं आपल्याला!“ कांदा आज राजकीय फडच रंगवत होता. “दुसऱ्या मुलखातून आलो म्हणून काय झालं? उपासालासुद्धा माझीच गरज लागते. रोजच्या जेवणात तर माझ्याशिवाय काही घडतच नाही म्हण की!“ बटाटासुद्धा आज ऐकणार नव्हता. “आरं, अस्सल मराठी माणूस असतोय ना, त्याला बाकी काही नसलं तर चालंल, पण भाकरीबरोबर मुटका मारून फोडलेला कांदा लागतोयंच!“ कांद्यानं मुद्दा सोडला नाही. “असेल, असेल. पण तुझा वास आवडत नाही, म्हणून तुला जवळपास फिरकूसुद्धा न देणारेही खूप आहेत. अरे, मी एवढा लाडका आहे, की एखाद्या गुटगुटीत मुलालासुद्धा माझ्या नावानं हाक मारली जाते! तू कितीही गप्पा मार रे, पण माझं नावच इतिहासात अमर होणारेय, लक्षात ठेव!“ बटाट्यानं पुन्हा छाती फुगवली, त्याचवेळी त्याच्या मालकिणीनं त्याला वरच्या वर अलगद उचलला आणि आलू चाट करण्यासाठी गॅसवर चढवला.

Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
How To Make Egg Fry
How To Make Egg Fry: भुर्जी पेक्षाही टेस्टी! १५ ते २० मिनिटांत बनवा ‘अंडा फ्राय’; लहान मुलंही आवडीने खातील ‘ही’ रेसिपी
Chicken tikka easy version recipe chicken starter easy recipe
Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
How To Make Dahi Kabab In Marathi
Dahi Kabab Recipe : फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ‘दही कबाब’; कुरकुरीत, रेस्टोरंटसारखे कबाब पाहून तोंडाला सुटेल पाणी
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • ४-५ बटाटे
  • दोन टेबलस्पून तेल
  • एक छोटा चमचा सैंधव (काळे मीठ)
  • एक छोटा चमचा साधे मीठ
  • एक छोटा चमचा भाजलेले जिरे
  • दोन वाट्या दही
  • चिंच-खजूर व गुळाची आंबट-गोड चटणी
  • कोथिंबीर-पुदिन्याची हिरवी चटणी
  • एक वाटी बारीक शेव
  • चपट्या पुऱ्या
  • दोन चमचे चाट मसाला
  • अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

 

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • दही फेटून ठेवा.
  • चिंच-खजूर व गुळाची आंबट-गोड चटणी आणि कोथिंबीर-पुदिन्याची हिरवी चटणी करून ठेवा.
  • बटाटे उकडून घ्या आणि सालं काढून बटाटे चिरून छोट्या छोट्या फोडी करून ठेवा.
  • नॉनस्टिक तव्यावर तेल घालून गरम करून घ्या. गरम तेलात बटाट्यांच्या छोट्या चिरून ठेवलेल्या फोडी घाला आणि बटाट्याच्या फोडी सगळीकडून ब्राऊन होईपर्यंत परता.
  • परतलेल्या बटाट्याच्या फोडी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्या. त्यांच्यावर काळे सैंधव मीठ, साधे मीठ घालून मिसळून घ्या.
    सर्व्हिंग डिशेसमध्ये प्रत्येकी ४-५ चपट्या पुर्‍या घालून त्यावर बाउलमधल्या बटाट्यांच्या छोट्या फोडी घाला
  • मग त्या प्रत्येक पुरीवर वर दही, चिंच-खजूर व गुळाची आंबट-गोड चटणी, कोथिंबीर-पुदिन्याची हिरवी चटणी, बारीक शेव, चाट मसाला, कोथिंबीर घाला. आवडीच्या व्यक्तींनाच खायला द्या.

[/one_third]

[/row]