[content_full]
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कांदा आणि बटाटा अगदी हमरीतुमरीवर आले होते. आपण एकाच घरात, अगदी शेजारी शेजारी राहत असलो, तरी आपल्यात मूलभूत बरेच फरक आहेत, असा दोघांचा दावा होता. आज कांद्यानं खुसपट काढलं होतं. “उगा किंमतीवर घसरू नगंस. म्या किमतीत आसन तुझ्यापरीस कमी, पण स्वैपाकात आपल्यालाच जास्त भाव मिळतोय! काय काय घरांत तर आपल्या हजेरीबिगर पान हालत न्हाई!“ कांदा शेंडी ताठ करून सांगत होता. “ह्यॅ! तू एकटा काहीच करू शकत नाहीस. पण मी एकटा असलो, तरी भाजी म्हणून उपयोगी पडतो, कधी पौष्टिक म्हणून कामाला येतो, कधी रसभाजी मिक्स करण्यासाठी मध्यस्थ म्हणून माझा उपयोग केला जातो!“ सांगताना बटाट्याचा ऊर अभिमानानं भरून आला होता. “आरं, कितीबी झालं, तरी तू पडलास परमुलखाचा. म्या ह्या मातीतला अस्सल रांगडा गडी हाय! गावरान संस्कृतीचं परतीक मानलं जातं आपल्याला!“ कांदा आज राजकीय फडच रंगवत होता. “दुसऱ्या मुलखातून आलो म्हणून काय झालं? उपासालासुद्धा माझीच गरज लागते. रोजच्या जेवणात तर माझ्याशिवाय काही घडतच नाही म्हण की!“ बटाटासुद्धा आज ऐकणार नव्हता. “आरं, अस्सल मराठी माणूस असतोय ना, त्याला बाकी काही नसलं तर चालंल, पण भाकरीबरोबर मुटका मारून फोडलेला कांदा लागतोयंच!“ कांद्यानं मुद्दा सोडला नाही. “असेल, असेल. पण तुझा वास आवडत नाही, म्हणून तुला जवळपास फिरकूसुद्धा न देणारेही खूप आहेत. अरे, मी एवढा लाडका आहे, की एखाद्या गुटगुटीत मुलालासुद्धा माझ्या नावानं हाक मारली जाते! तू कितीही गप्पा मार रे, पण माझं नावच इतिहासात अमर होणारेय, लक्षात ठेव!“ बटाट्यानं पुन्हा छाती फुगवली, त्याचवेळी त्याच्या मालकिणीनं त्याला वरच्या वर अलगद उचलला आणि आलू चाट करण्यासाठी गॅसवर चढवला.
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- ४-५ बटाटे
- दोन टेबलस्पून तेल
- एक छोटा चमचा सैंधव (काळे मीठ)
- एक छोटा चमचा साधे मीठ
- एक छोटा चमचा भाजलेले जिरे
- दोन वाट्या दही
- चिंच-खजूर व गुळाची आंबट-गोड चटणी
- कोथिंबीर-पुदिन्याची हिरवी चटणी
- एक वाटी बारीक शेव
- चपट्या पुऱ्या
- दोन चमचे चाट मसाला
- अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- दही फेटून ठेवा.
- चिंच-खजूर व गुळाची आंबट-गोड चटणी आणि कोथिंबीर-पुदिन्याची हिरवी चटणी करून ठेवा.
- बटाटे उकडून घ्या आणि सालं काढून बटाटे चिरून छोट्या छोट्या फोडी करून ठेवा.
- नॉनस्टिक तव्यावर तेल घालून गरम करून घ्या. गरम तेलात बटाट्यांच्या छोट्या चिरून ठेवलेल्या फोडी घाला आणि बटाट्याच्या फोडी सगळीकडून ब्राऊन होईपर्यंत परता.
- परतलेल्या बटाट्याच्या फोडी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्या. त्यांच्यावर काळे सैंधव मीठ, साधे मीठ घालून मिसळून घ्या.
सर्व्हिंग डिशेसमध्ये प्रत्येकी ४-५ चपट्या पुर्या घालून त्यावर बाउलमधल्या बटाट्यांच्या छोट्या फोडी घाला - मग त्या प्रत्येक पुरीवर वर दही, चिंच-खजूर व गुळाची आंबट-गोड चटणी, कोथिंबीर-पुदिन्याची हिरवी चटणी, बारीक शेव, चाट मसाला, कोथिंबीर घाला. आवडीच्या व्यक्तींनाच खायला द्या.
[/one_third]
[/row]