Preservation Of Raw Mango: हिवाळ्यात, पावसाळ्यात आंबट, चटपटीत कैरीची कधीही आठवण येतेच.. अशावेळी कैरीची भूक मग कैरीच्या लोणच्यावर भागवावी लागते. असं होऊ नये म्हणूनच तर बघा आंबोशी- करकरीत कैरी वर्षभर जशीच्या तशी साठवून ठेवण्यासाठी खास टिप्स..आता आंबोशी तसा काही नवीन प्रकार नाही. पण गावात पेजेसोबत आंबोशी खाण्याची पद्धत आहे. शिवाय वरण भातासोबत भाजी नसेल तर आंबोशीमुळे चांगली चव मिळते.
आंबोशी साहित्य
- १ किलो कैरी
- ५०० ग्रॅम साखर
- १ टीस्पुन काळ मीठ
- १ टीस्पुन चाट मसाला
आंबोशी कृती
प्रथम कैरी स्वच्छ धुऊन पुसुन घ्या.
त्याची वरची साल काढुन त्याचे लांब लांब. तुकडे करुन घ्या. कैऱ्यांचे पातळ काप करा. त्याला चांगले मीठ लावा. त्यात साखर मिक्स करा
जर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर फारच उत्तम तुम्ही त्याला खडे मीठ लावू शकता.मीठ लावल्यामुळे कैऱ्यांना पाणी सुटते.
छान मिक्स करा व बारा तास तसेच झाकुन. ठेवा, त्याल पाणी सुटलेल असेल, हे पाणी चाळणीत निथरुन घ्या, त्यात आता काळमीठ, चाट मसाला भुरभुरुन ते चार ते पाच दिवस उन्हात वाळत घाला.
कैऱ्या तशाच तुम्ही उन्हात वाळवा.कडकडीत वाळल्यानंतर तुम्ही कैऱ्या कधीही खाऊ शकता. तुम्हाला कैरीचं लोणचं नको असेल तर तुम्ही आंबोशी खाऊ शकता.
हेही वाचा >> १ किलो बटाटे वापरून घरच्याघरी बनवा खमंग ‘बटाटा वेफर्स’; ३ वर्ष खराब होणार नाहीत
टिप- हे वर्षभर छान टिकतात, प्रवासात खाण्यासाठी (चॅाकलेट ऐवजी)उपयुक्त. खूप टेस्टी लागतात, नक्की ट्राय करा