Banana Coffee: अनेक लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने करतात. चहा नंतर कॉफी हे सर्वात लोकप्रिय पेय आहे. कॉफी केवळ मूड चांगला ठेवण्याचे काम करत नाही तर आपला मूड फ्रेश ठेवण्यास मदत करते. तुम्ही ब्लॅक कॉफी, कोल्ड कॉफी, कॅपुचिनो, तुर्की कॉफी, आयरिश कॉफीची नावे ऐकली असतील किंवा प्यायला असाल मात्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक स्पशेल कॉफी. ही कॉफी सध्या मार्केटमध्ये ट्रेंड होत आहे. या कॉफीचं नाव आहे, ‘बनाना कॉफी’. चला तर मग पाहुयात ‘बनाना कॉफी’ कशी करायची.
‘बनाना कॉफी’ चवीसोबतच पौष्टिकतेनेही परिपूर्ण
ही कॉफी बनवण्यासाठी दुधाची गरज पडणार नाही. ही खास कॉफी बनवण्यासाठी फक्त पिकलेली केळी आणि बारीक ब्लॅक कॉफी हवी आहे. ही बनाना कॉफी चवीसोबतच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केळी हे आहारातील फायबर तसेच अनेक आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे असलेले फळ मानले जाते. यामुळेच यापासून बनवलेली ‘बनाना कॉफी’ चवीसोबतच पौष्टिकतेनेही परिपूर्ण असते.
कशी बनवायची बनाना कॉफी –
केळी कॉफी बनवण्यासाठी तुम्हाला २ पिकलेली केळी आणि एक कप कोल्ड कॉफीची गरज आहे. त्यानंतर पिकलेली केळी कोल्ड कॉफीमध्ये मिसळून घ्या. तुम्हाला फक्त गोठवलेली केळी कोल्ड ड्रिप कॉफीमध्ये मिसळायची आहे जोपर्यंत ते गुळगुळीत होत नाही. पिकलेल्या केळीत जास्त गोडवा असतो त्यामुळे तुम्हाला या कॉफीमध्ये साखर वगैरे इतर गोड पदार्थ घालण्याची गरज नाही. केळीची कॉफी अधिक चवदार बनवायची असेल तर त्यात व्हॅनिला अर्क, दालचिनी, नट बटर, कोको पावडर आणि जायफळ वगैरे टाकू शकता. जर तुम्हाला चॉकलेटची चव खूप आवडत असेल तर तुम्ही या कॉफीमध्ये चॉकलेटचाही समावेश करू शकता.
हेही वाचा – झणझणीत गोळ्यांची आमटी! भाजीला चमचमीत पर्याय, जाणून घ्या रेसिपी
‘बनाना कॉफी’ त्या लोकांना आवडेल, ज्यांना कॉफी पिण्याची खूप आवड आहे. जर तुम्हाला वेगळ्या चवीची कॉफी प्यायची असेल तर तुम्ही घरीच ‘बनाना कॉफी’ तयार करू शकता.