या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झणझणीत मसाला, कुरमुरे, लिंबू, कांदा, कैरी, मिरची, गोड-तिखट चटणी आणि त्यावर बार भुरभुरलेली शेव आणि कोंथिंबीर… अशी मस्त सजलेली भेळ पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. यात जर तुम्हाला नाष्ट्यात काही हलक-फुलक खायचं असेल तर भेळ एक बेस्ट ऑप्शन आहे. मात्र तुम्ही चटपटीत, चवीला रुचकर अशी बंगाली स्पेशल ‘झाल मुरी’ भेळ कधी ट्राय केली का? नाही ना, तर आजचं करा. कारण आज लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातून खास तुमच्यासाठी ‘झाल मुरी’ भेळ घेऊन आलो आहे. ही भेळ चवीला तर मसालेदार आहेच, पण त्यातून शरीरास आवश्यक पौष्टिक घटकही मिळतात. विशेषत: बंगाल, कोलकत्तामधील छोट्या- छोट्या गल्ल्यांमध्ये या भेळचे स्टॉल पाहायला मिळतात. या भेळमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्पेशल मसाल्यांमुळे तिला एक चटकदार चव येते. चला तर मग घराच्या घरी ही भेळ कशी बनवायची ते जाणून घेऊ…

झाल मुरी भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

पाव वाटी तेल, पाव वाटी मोहरी तेल, ३ वाटी कुरमुरे, १ वाटी जाडे फरसाण, पाव वाटी तळलेले शेंगदाणे, पाव वाटी ओल्या नारळाच्या तेलात परतवलेले तुकडे, अर्धा वाटी काकडीचे तुकडे, उकडलेल्या एका बटाट्याच्या फोडी, पाव वाटी बारीक चिरलेली कच्ची कैरी, बारीक चिरलेल्या मिरच्या, अर्था वाटी वाटलेला कांदा, १ चमचा आल्याची पोस्ट, १ चमचा लसणाची पेस्ट, १ चमचा धणे, अर्धा चमचा तिखट, अर्धा कप मोहरी, अर्धा चमचा हळद आणि लिंबू.

घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर मटकी भजी; जाणून घ्या सोपी रेसिपी

असा तयार करा भेळेसाठी स्पेशल मसाला:

अर्धा चमचा मसाला, १ चमचा जिरं, एक दालचिनीचा छोटा तुकडा, १ जायपत्री, ४-५ वेलची, लवंग हे सगळे मसाले मंद गॅसवर ठेवून भाजून बारीक पूड तयार करा.

झाल मुरी भेळ बनवण्याची कृती

एका नॉनस्टिक कडईत पाव पाटी तेल घ्या, त्यात अर्धा कप मोहरीचं तेल घाला, ही दोन्ही तेल गरम होण्यासाठी गॅसवर मंद आचेवर ठेवा. त्यात अर्धा कप वाटलेला कांदा, एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट, एक चमचा धणे पूड, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि आधी भाजून पेस्ट केलेला स्पेशल भेळ मसाला टाकून हे सर्व मिश्रण 10 ते 12 मिनिटं परतून घ्या. यात कुरमुरे सोडून बाकी सर्व पदार्थ एकत्र करुन मिसळून घ्या. आता गॅस बंद करा. यानंतर तेलात भाजलेला सर्व मसाला, आवश्यकतेनुसार मीठ आणि कुरमुरे घालून पुन्हा सर्व मिश्रण एकत्र कालवा. अशाप्रकारे खाण्यासाठी तयार झाली तुमची बंगाली स्पेशल झाल मुरी भेळ…

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make bengali special jhal muri bhel sjr
Show comments