How To Make Bharleli Shimala Mirchi : जेवणात रोज कोणती भाजी बनवावी हा प्रश्न अनेक महिलांना पडतो. सतत कडधान्य, पालेभाज्या, खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा मनात निर्माण होते. अशावेळी आपल्याकडे वेगवेगळ्या भाज्यांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे मसाले भरून ते स्टफ करून खाण्याची पद्धत आहे. यामध्ये जास्त तर भरलेली भेंडी, भरलेली वांगी घरी आवर्जून बनवली जाते. तर तुम्ही थोडं वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात भरलेली शिमला मिरची बनवू शकता. आज सोशल मीडियावर एका युजरने भरलेल्या सिमला मिरचीची रेसिपी (Stuffed Shimla Mirchi) दाखवली आहे. चला तर पाहुयात भरलेल्या सिमला मिरची कशी बनवायची आणि त्यासाठी काय साहित्य लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य (Stuffed Shimla Mirchi Ingredients) :

सिमला मिरची

तेल

राई

जिरे

हिंग

हिरवी मिरची

ओवा

आलं

कांदा

मीठ

उकडलेले बटाटे

हळद

मसाला

जिरा पावडर

धणे पावडर

कस्तुरी मेथी

आमचूर पावडर

कोथिंबीर

हेही वाचा…How To Make Soya Cutlet : सोयाबीन कटलेट कधी खाल्ले आहेत का? मग मुलांच्या डब्यासाठी नक्की बनवा; पटकन वाचा सोपी रेसिपी

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (How To Make Stuffed Shimla Mirchi ) :

चार ते पाच सिमला मिरची घ्या.

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे सिमला मिरचीचे दोन भाग करून घ्या.

त्यानंतर कढईत तेल घ्या.

तेलात राई, जिरे, हिंग हिरवी मिरची, ओवा, आलं, कांदा, मीठ, उकडलेले बटाटे, हळद, मसाला, जिरा पावडर, धणे पावडर, कस्तुरी मेथी, आमचूर पावडर कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

नंतर तयार केलेलं मिश्रण कापून घेतलेल्या सिमला मिरचीमध्ये घाला.

पॅनमध्ये तेल घ्या. मिश्रण भरून घेतलेल्या सिमला मिरची त्यामध्ये ठेवा आणि त्यात थोडं पाणी घाला.

थोडा वेळ झाकण ठेवून द्या.

अशाप्रकारे तुमची भरलेली सिमला मिरची तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @desi_recipes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

सिमला मिरची खाण्याचे आरोग्यदायी फायदे

सिमला मिरचीच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. सिमला मिरचीमधील गुणकारी तत्त्वांमुळे हृदयाच्या शिरा बंद होत नाहीत. कारण यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे आहारामध्ये सिमला मिरचीचा समावेश केल्यानं हृदय निरोगी राहण्यास मदत होते.आपल्याला मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर, शिमला मिरची आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. शिमला मिरची रक्तातील साखरेसाठी आवश्यक योग्य पातळी राखते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make bharleli shimala mirchi or stuffed shimla mirch read marathi recipe and try ones at home asp