Fluffy Bhature : छोले भटुरे हा आपल्यापैकी अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. आपण अनेकदा छोटे भटुरे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खातो. काही लोक घरी सुद्धा आवडीने छोले भटुरे बनवून खातात पण भटुरे फुलत नाही, अशी काही जणांची तक्रार असते. जर तुम्ही केलेले भटुरे फुलत नसेल तर टेन्शन घेऊ नका. या खास टिप्स फॉलो करुन तुम्ही टेस्टी आणि मऊ फुललेले भटूरे बनवू शकता. जाणून घ्या ही खास रेसिपी
साहित्य :-
- मैदा
- मीठ
- फेटलेले अंडे
- गरम पाणी
- तळणासाठी तेल
- दही
- खमीर (yeast)
हेही वाचा : खारी शंकरपाळी कुरकुरीत कशी बनवायची? नोट करा ही सोपी रेसिपी
कृती
- मैदा, मीठ आणि खमीर एकत्रित मिश्रण करावे
- त्यात दही आणि गरम पाणी टाकावे
- आणि पीठ चांगले मळून घ्यावे
- हे पीठ ४-६ तासासाठी एखाद्या गरम ठिकाणी ठेवावे.
- गोल-गोल छोट्या पोळ्या लाटाव्या
- तेल गरम करून भटूरे लालसर तळावे
- छोल्यांबरोबर हे भटूरे तुम्ही गरम गरम खाऊ शकता.