Poha Bhel : दररोज नाश्त्याला काय बनवावं, हा प्रश्न अनेकांना येतो. पोहे, इडली, डोसा, उप्पीट हे नेहमी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एक हटके पोह्यांची रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये भेळ पोहे बनवू शकता. हे टेस्टी भेळ पोहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकते. भेळ पोहे कसे बनवायचे, जाणून घ्या ही सोपी रेसिपी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :-

  • पातळ पोहे
  • खारे दाणे
  • शेव
  • हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • लिंबू
  • कांदे
  • कोथिंबीर
  • खोबरे
  • साखर
  • मीठ

हेही वाचा : पालकांनो, मुलांसाठी घरीच बनवा झटपट चुरमुऱ्याचे लाडू, नोट करा ही सोपी रेसिपी

कृती

  • तेलात हिंग-जिरे घाला आणि फोडणी द्या
  • नंतर त्यात पोहे घालून मंद आचेवर परतवा.
  • पोहे चांगले कुरकुरीत झाले गॅस बंद करा
  • बारीक कांदा चिरा.
  • कुरकुरीत पोह्यांमध्ये कांदे, खारे शेंगदाणे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, खोबरे, कोथिंबीर, साखर, मीठ टाका.
  • नंतर सर्व मिश्रण एकत्र करा आणि भेळ बनवा
  • शेवटी भेळवर लिंबूचा रस आणि शेव टाका
  • सर्व्ह करा
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make bhel poha recipe breakfast recipe poha lovers food news ndj
Show comments