How To Make Bhindi Crispy: कुरकुरीत भेंडीची भाजी चवीला अत्यंद स्वादिष्ट असते. तसेच भेंडीमध्ये फायबर आणि न्युट्रीशन असतात ज्यांच्या सेवनामुळे कोलेस्टॉल आणि साखर अशा आरोग्याच्या समस्या दूर होऊ शकतात. पण कित्येक लोकांनी भेडी खायला आवडत नाही करण ती खाताना चिकट होते. भेंडीमध्ये काही अशी घटक असतात ज्यामुळे ती चिकट होते. सर्वात अवघड काम म्हणजे भेंडीची भाजी कापणे आणि तयार करणे आहे. भेंडीच्या चिकटपणामुळे ही भाजी तयार करणे जरा किचकट काम आहे. म्हणूनच आज तुम्हाला आम्ही काही सोप्या टीप्स सांगणार आहोत .ज्यांचा वापर करुन तुम्ही भेंडीचा चिकटपणा सहज घालवू शकता आणि त्याची चव आणखी वाढवू शकते.
भेंडीची भाजी तयार करताना चिकटपणा असा करा दूर
जेव्हा तुम्ही भेंडी धुता तेव्हा त्याचा ओलसरपणा दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे न केल्यामुळे पाण्यामुळे भेंडीचा चिकटपणा जास्त वाढतो. त्यामुळे भेंडी कापताना व्यवस्थित टॉवेलने कोरडी करून घ्या. भेंडी धुतल्यानंतर एक तासाने कापली तरी चालेल.
मोठे काप करा
जेव्हा तुम्ही भेंडी कापता तेव्हा त्याचे छोटे काप न करता मोठे काप करा. मोठे काप केल्यामुळे ती अधिक कुरकुरीत होऊ शकते. भेंडीच्या एका शेंगाचे जास्तीत जास्त २-३ तुकडे केले तर बरे होईल.
हेही वाचा : ‘Best Before’ तारीख ओलांडलेले खाद्यपदार्थ खाणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
तेल टाकून चांगली परतावे
भेंडी तेल टाकून चांगली परतून घ्या म्हणजे त्याचा चिकटपणा दूर करू होईल. ही एक प्रभावी पद्धत आहे. यासाठी तुम्ही कढईत भेंडीचे मोठे तुकडे परतून घ्या.
हेही वाचा : चपातीला तूप लावून खावे की नाही? डॉक्टरांकडून जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
लिंबाचा रस वापरा
भेंडीमधील चिकटपणा दूर करण्यासाठी भेंडीची भाजी झाल्यानंतर शेवटी त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. त्यामुळे चिकटपणा सहज दूर करू शकता.
दहयाचा करा वापर
दह्यामध्ये अम्लीय घटक देखील असतात, जे भेंडीच्या चिकटपणा दूर करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. दह्याव्यतिरिक्त तुम्ही चिंचेचा रस किंवा वाळलेल्या कैरीची पावडर देखील वापरू शकता. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवावे की कोरडी भाजी बनवताना त्यात कोरडी कैरी पावडर किंवा लिंबाचा रस घाला आणि ओली भाजी बनवायची असेल तर चिंचेचा रस किंवा दही वापरा.