Bun Dosa Recipe In marathi : रविवार असो किंवा आणखीन कोणता दिवस नाश्त्यासाठी सर्वाधिक दक्षिण भारतीय पदार्थ खाणे पसंत केले जातात. उपमा, इडली, मेदूवडा, डोसा, शिरा, उत्तप्पा हे पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम तर आहेतच; पण ते पचायलाही हलके असतात. त्यामुळे हे पदार्थ प्रत्येक घरात अगदी आवर्जून बनवले जातात. त्याचप्रमाणे दररोज स्टेशनच्या बाहेर, ऑफिसच्या खाली तर अनेक स्टॉलवरही हे पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि ग्राहक देखील याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात. तर आज आपण डोसा, इडलीला ट्विस्ट देणारा एक खास पदार्थ कसा बनवायचा हे पाहणार आहोत. सोशल मीडियावर एका युजरने ‘बन डोसा’ (Bun Dosa) कसा बनवायचा हे दाखवलं आहे. तर चला पाहुयात यासाठी साहित्य काय लागेल.
साहित्य (Bun Dosa Ingredient )
- एक कप बारीक रवा
- ३/४ कप दही
- १/२ कप पाणी आणि
- मोहरी
- जिरे
- उडीद डाळ
- चणा डाळ
- बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो
- कढीपत्ता, लाल मिरची
- कोथिंबीर
- बेकिंग सोडा
व्हिडीओ नक्की बघा…
कृती (How To Make Bun Dosa)
- एका बाउलमध्ये बारीक रवा आणि दही घ्या, त्यात पाणी टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- आता १० मिनिटे तसंच ठेवा.
- दुसरीकडे पॅनमध्ये तेल घ्या. त्यात थोडी मोहरी, जिरे, उडीद डाळ, बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या. पटकन परतून घ्या आणि बाजूला ठेवा.
- त्यानंतर रवा, दही आणि पाण्याचे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि व्यवस्थित बारीक करून घ्या.
- नंतर एका बाउलमध्ये हे मिश्रण ओतून घ्या त्यात फोडणी आणि थोडी ताजी कोथिंबीर घालून नीट मिक्स करा.
- १/४ चमचा बेकिंग सोडा, थोडे पाणी घालून चांगले मिक्स करा.
- त्यानंतर हे पीठ अगदी व्हिडीओत फोडणी देण्याच्या पॅनमध्ये शिजवून घ्या.
- अशाप्रकारे तुमचा बन डोसा तयार.
चटणी बनवण्याची कृती –
- कढईत थोडे तेल घ्या.
- तेलात एक चमचा चणा डाळ, उडीद डाळ घाला.
- थोडं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
- त्यात एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडी भिजवलेली काश्मिरी लाल मिरची पावडर घालून थोडा वेळ शिजवा.
- त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात या मिश्रणाची पेस्ट करून घ्या आणि मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरचीचा फोडणी द्या.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @myflavourfuljourney या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.