जर आपल्याला बटाटा वडा किंवा कांदा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर, कोबीचे वडे करून पाहा. कोबीची भाजी, पराठा आपण खाल्लंच असेल, पण यंदा कोबीचे वडे करून पाहा. कोबी खाण्याचे अनेक फायदे आहेत . त्यामुळे आरोग्याला पौष्टीक आणि चवीला भन्नाट अशी कोबीचे वडे कसे तयार करायचे पाहूया. ही रेसिपी अगदीच युनिक आहे. आम्हाला वेगळी वाटली म्हणून आम्ही ती तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
कोबी आणि डाळीचे पौष्टिक वडे साहित्य-
- १ ते २ वाटी हिरव्या मुगाची डाळ (सालवाली)
- साधारण अर्धा किलो कोबी
- १ चमचा लसूण
- लाल तिखट, हळद, मीठ
- जिरे, हिंग
कोबी आणि डाळीचे पौष्टिक वडे कृती-
१. आदल्या रात्री तुम्हाला डाळ धुवून रात्रभऱ भिजत ठेवा. सकाळी पाणी न घालता डाळ वाटून घ्या. कोबी बारीक किसून घ्या.
२. एका परातीत तुम्ही वाटलेली डाळ घ्या. डाळ हाताने चांगली फेटून घ्या. फेटल्यामुळे डाळ हलकी होते. साधारण 2 ते 3 मिनिटे तुम्हाला चांगले फेटून घ्यायचे आहेत.
३. डाळ हलकी झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ठेचलेला लसूण, लाल तिखट, जिरे, हिंग, मीठ घाला. त्यात किसलेला कोबी घाला. मिश्रण एकजीव करुन घ्या.
४. तयार पीठाच्या वड्या प्लास्टिकवर पाडून घ्या. वड्या चांगल्या कुरकुरीत वाळवून घ्या.
हेही वाचा >> १ किलो बटाटे वापरून घरच्याघरी बनवा खमंग ‘बटाटा वेफर्स’; ३ वर्ष खराब होणार नाहीत
५. तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की याची भाजी करु शकता. ही भाजी करणेही अगदी सोपे असते.