थंडीच्या दिवसांमध्ये अनेकदा आपल्या घरी मस्त केशरी रंगाची आणि चवीला गोडसर असणारी गाजरं आणली जातात. बहुतेकवेळा त्याचा वापर आपण कोशिंबीर, सॅलड किंवा सूपमध्ये करत असतो. यांपेक्षा अजून एक पदार्थ अगदी आवर्जून बनवला जातो तो म्हणजे गाजराचा हलवा. मात्र या काही निवडक पदार्थांपेक्षा अजून चटपटीत आणि बराचकाळ टिकून राहणारी गोष्ट आपण या गाजरांचा वापर करून बनवू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ती म्हणजे, गाजराचे लोणचे. प्रत्येक वातावरणात अशी कुठलीतरी गोष्ट असतेच, ज्याचा वापर करून आपल्याला चटपटीत आणि जेवणाची चव वाढवणारे लोणचे बनवता येते. लोणचं बनवण्यास सोपे असून ते अधिककाळ टिकून राहते. असे गाजरापासून लोणचे बनवण्यासाठी अत्यंत सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @me_haay_foodie नावाच्या अकाउंटने शेअर केली आहे. आता ते कसे बनवायचे हे पाहा.

हेही वाचा : Recipe : केवळ १० मिनिटांमध्ये तयार होणारा महाराष्ट्रीयन ‘काकडीचा कोरडा’ कसा बनवायचा? रेसिपी घ्या, बनवून पाहा…

गाजराचे लोणचे रेसिपी

साहित्य

तेल १/२ कप
गाजर – २५० ग्रॅम
बडीशेप – १ चमचा
जिरे १/२ चमचा
मेथी दाणे १/४ चमचा
चिरलेले आले १ इंच
मोहरीचे दाणे २ चमचे
लाल तिखट १ चमचा
हळद १/४ चमचा
हिंग १/४ चमचा
लिंबाचा रस किंवा व्हिनेगर २ चमचे
मीठ

हेही वाचा : Recipe : पालकाला द्या लसणीचा खमंग तडका! कशी बनवायची ‘लसूणी पालक’ भाजी रेसिपी पाहा

कृती

सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून घेऊन त्यांना सोलाण्याच्या मदतीने सोलून घ्या.
आता त्याचे बारीक फोडी चिरून एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यावर थोडे मीठ लावून बाजूला ठेवून द्या.
एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये बडीशेप, मेथी दाणे आणि जिरे घालून वाटून त्याची बारीक पावडर करून घ्या.
आता एक लोखंडी किंवा कोणतीही कढई घेऊन त्यामध्ये तेल घालून त्याला व्यवस्थित तापू द्यावे.
तेल तापल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले आल्याचे तुकडे घालून परतून घ्यावे.
त्यानंतर तेलात मोहरीचे दाणे, हिंग आणि मीठ लावलेल्या गाजराच्या फोडी घालून सर्व पदार्थ ढवळून घ्यावे.
आता यात मीठ, हळद, लाल तिखट आणि तयार केलेली बडीशेप, मेथी दाणे आणि जिरे यांची पावडर घालून घ्या.
त्यासह लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालून सर्व पदार्थ छान ढवळून घ्यावे.
सर्व पदार्थ काही मिनिटांसाठी मंद आचेवर ढवळून काही वेळाने कढईखालील गॅस बंद करून घ्यावा.
तयार लोणचे काचेच्या घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.
तयार आहे आपले चटपटीत आणि खमंग असे गाजराचे लोणचे.

सोशल मिडियावर शेअर झालेल्या या अफलातून गाजराचे लोणचे या रेसीपीला आत्तापर्यंत १६६k इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make carrot pickle gajarache lonche at home follow these simple steps for easy and tasty recipe check out dha