सध्या हिवाळ्यात बाजारात सगळ्याच भाज्या फ्रेश मिळतात. हिवाळ्यात आपल्याला लाल चुटुक गाजर दिसली की, गाजर हलवा बनवून खाण्याचा मोह होतो. गाजर हलवा केल्यास ज्या व्यक्तींना मधुमेह आहे ते फारसे खाऊ शकत नाहीत. गाजराची कोशिंबीर केली तर घरातील लहान मुलं कोशिंबीरीतील गाजर बाजूला काढून ठेवतात. मग नक्की या गाजरामधील पोषक तत्व आपल्यापर्यंत पोहोचणार कशी? यासाठी आता बनवा गाजरांची भाजी.
गाजर भाजी साहित्य
- चार गाजर किसून घेतलेले
- एक कांदा
- पाणी
- तीन ते चार लसूण पाकळ्या
- दोन चमचे तेल
- एक चमचा जिरे मोहरी
- अर्धा चमचा लाल तिखट
- एक चमचा काळा मसाला
- अर्धा चमचा हळद
- चवीनुसार मीठ
- एक चमचा साखर
- कोथिंबीर
गाजर भाजी कृती
स्टेप १
गाजर किसून घ्यावे कांदा बारीक चिरून घ्यावे. एका कढईत तेल गरम करून घ्या त्यात जिरे मोहरी तडतडली की लसूण लाल परतल्यावर त्यात कांदे घालून परतून घ्यावे.
स्टेप २
किसलेला गाजर त्यात घालून छान तेलात परतून घ्या पाच मिनिट यानंतर वरील सर्व मसाले घालून छान परतून घ्या.
हेही वाचा >> Datta Jayanti 2023: दत्त जयंतीनिमित्त घरच्याघरी तयार करा सुंठवड्याचा नैवेद्य; वाचा पूर्ण रेसेपी
स्टेप ३
एक वाटी पाणी घालून त्यावर एक बेस्ट टाकून भाजी शिजवून घ्यावी. यानंतर गाजराची भाजी एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यावे त्यावर कोथिंबीर भरपूर आहे.