नेहमीच्या चिकनच्या रेसिपी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हटके चिकनची रेसीपी ट्राय करू शकता. ही एक सोपी पण स्वादिष्ट चिकन रेसिपी आहे, जी जास्त मेहनत न करता काही मिनिटांत बनवता येते. ही एक हेल्दी रेसीपी आहे. या रेसिपीचं नाव आहे चिकन कटलेट. चला तर घरच्या घरी झटपट चिकन कटलेट कसे तयार करायचे.
चिकन कटलेट साहित्य –
- ५०० ग्रॅम बॉइल्ड चिकन, उकडलेले बटाटे – तीन
- दोन ते तीन मध्यम आकाराचे चिरलेले कांदे
बारीक चिरलेले लसूण, किसलेले आले, - दोन ते तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्या,
- दोन चमचे मिरपूड, तीन चमचे धणे पूड
दोन चमचे लाल तिखट, दीड चमचा चिकन मसाला, - एक चमचा गरम मसाला, चार ते पाच हिरव्या मिरच्या
थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, चवीनुसार मीठ - चिमूटभर हिंग, तळण्यासाठी तेल, पाच ब्रेडचे स्लाइस, दोन अंड
चिकन कटलेट कृती –
- चिमूटभर हळद, मिरपूड आणि व्हिनेगर घालून ३-४ शिट्ट्या येईपर्यंत चिकन शिजवून घ्या. शिजलेलं चिकन एका मोठ्या बाउलमध्ये काढा. चिकन मॅश करून घ्या. दुसऱ्या बाउलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करा.
- पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेलामध्ये मोहरी, बारीक चिरलेले लसूण, आले आणि कढीपत्ताही घालावा. यानंतर दोन ते तीन चिरलेल्या हिरव्या मिरच्याही मिक्स करा. चवीनुसार मीठ घालून सर्व सामग्री नीट फ्राय करा.
- यानंतर पॅनमध्ये चिरलेले कांदे घाला. नंतर चिकन मसाला, गरम मसाला, दोन चमचे लाल तिखट आणि तीन चमचे धणे पूड घालून सर्व सामग्री नीट ढवळून घ्या.
- मसाल्यामध्ये मॅश केलेले चिकन मिक्स करा. थोडंसं चिकन स्टॉकही घाला. यानंतर पॅनमध्ये मॅश केलेले बटाटे घालून सर्व सामग्री पाच मिनिटे शिजू द्यावी.
- दुसऱ्या एका बाउलमध्ये दोन अंडी फेटून ठेवा आणि ब्रेडचा चुरा देखील तयार करा. आता मसाल्याचे लहान-लहान गोळे तयार करा. फेटलेल्या अंड्यामध्ये मसाल्याचा गोळा डिप करून ब्रेडच्या चुऱ्याने कोटिंग करा.
हेही वाचा – Vegetable Dalia recipe: नाश्त्यासाठी बनवा व्हेजिटेबल दलिया, टेस्ट सोबत मिळेल पोषण!
- यानंतर मसाल्याच्या गोळ्यांचे कटलेट तयार करून घ्या. तेलामध्ये कटलेट फ्राय करून घ्या. गरमागरम कटलेट सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.