आजकालच्या तरूणाईबरोबर सगळ्यांनाच मोमोज हे नाव माहीत आहे. भाज्या आणि चिकनने भरलेला हा पदार्थ लोकांच्या हृदयावर इतका राज्य करत आहे की, लोकांना त्याचे वेड लागले आहे. आजकाल या वाफवलेल्या पदार्थाची अनेक व्हरायटी येऊ लागली आहे. ज्यात फ्राय मोमोज ते चीज मोमोज यांचा समावेश आहे. मसालेदार चटणीच्या अप्रतिम चवीचा विचार करूनच तोंडाला पाणी सुटते. मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. चला तर आज पाहुयात चिकन मटण मोमोज
चिकन/मटण मोमोज साहित्य –
- एक वाटी चिकन/ मटण खिमा
- कांदा, लसून, अदरक, मिर्ची, टमाटर, कोथींबीर
- मिरे, कलमी, मोठी वेलची, जायफळ, शाहजीरे याला भाजून बारीक करणे
- एक वाटी कणीक
- एक छोटा चमचा तेल, पाणी, मीठ
चिकन/मटण मोमोज कृती –
सर्वप्रथम पुऱ्याप्रमाणे तेलाचे मोहन घालून जरा घट्टसर कणीक भिजवा व बाजूला ठेवा. कांदा आणि आलं लसूण पेस्ट घालून चिकन/ मटण खिमाचे परतून घट्टसर सारण बनवा. आता कणकेचे छोटे उंडे पातळ लाटून त्यात भरपूर सारण भरून मोमोज करा. त्यानंतर कूकरमध्ये शिट्टी न लावता इडलीप्रमाणे १० ते १५ मिनिटे वाफवा. गरमागरम मोमोज सूप सोबत खा. यालाही हवे तसे उकडीचे किंवा फ्राईड आवडीनूसार करून खाता येते.
हेही वाचा – घरच्या घरी हॉटेल स्टाईल क्रिस्पी चिली चिकन बनवून Sunday बनवा स्पेशल; लगेच नोट करा रेसिपी
टोमॅटो चटणी
मोमोज चटणी ही तोंडाला आणि डोळयांनाही पाणी आणणारी असते. जेवढी चटणी करायची, तेवढे टमाटर, कोथींबीर, हिरवी मिर्ची, लाल तिखट, भाजलेले जिरे बारीक वाटून घेणे, थोडे हिंग, स्वादानुसार मीठ टाकुन घट्ट होईपर्यत चागंले उकडून घ्यायचे. झणझणीत चटणी तयार. या चटणीसोबत मोमोज खाण्याची जी मजा आहे ती खाल्यावरच कळते.