भारतात चायनीज खाद्यपदार्थांचं क्रेझ खूप जास्त आहे. अनेकांना चायनीज खायला खूप आवडते. लहान मुले असो अथवा मोठी माणसे, सगळ्यांनाच चायनिज पदार्थांनी वेड लावले आहे. प्रत्येक विकेंडला चायनीज रेस्टॉरंट गर्दीने तुडुंब असतात. रस्त्याचा कडेला लागणाऱ्या गाड्यांवर पण तुम्ही चायनीज पदार्थ खायला गर्दी करत असतात. मुंबई- पुण्यातच नाही तर अगदी गावोगावी चायनीजची हवा आहे. मात्र चायनीज आपल्या आरोग्यासाठी हाणीकारक आहे असं आपण एकलं असेल. मात्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेल्या हा चायनिज प्रकाराचा जेवनात समावेश केला असता आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही. एरवी चायनीज पदार्थ म्हणजे तिखटच असं आपल्याला वाटतं मात्र ही रेसिपी लहान मुलंही आवडीनं खातील. त्यामुळे रोज रोज गव्हाच्या रोट्या खाऊन कंटाळला असाल तर लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील ही चियानीज रोटी नक्की ट्राय करा. चला तर मग जाणून घेऊया चियानीज रोटीची सोपी रेसिपी.
चियानीज रोटी कशी तयार करावी?
चियानीज रोटी साहित्य –
- ३ कप मैदा
- १ कप उकळलेले पाणी
- ३ चमचे रिफाईन्ड तेल
- २ चमचे तूप
- १ चमचा मीठ
चियानीज रोटी कृती –
मैद्याचं पीठ भिजवून घ्या. या पिठाचे १८ गोळे करा. गोळा पुरीएवढा लाटून घ्या. अशा दोन पुऱ्यांना एका बाजूने तेल लावा. तेल लावलेली बाजू एकमेकांवर ठेवून हलकेच दाबा व पुन्हा लाटून पोळी मोठी करा. तव्यावर टाकून शेका. लगेचच उलटून दुसऱ्या बाजूने साधारण डाग पडले की काढा. पोळपाटावर अलगदपणे आपटा. पोळीचे दोन भाग होतील ते सोडवून घ्या. या पोळ्या मोदकपात्रात वाफवून घ्या. नंतर कपड्यावर टाका व घडी करुन प्लेटमध्ये ठेवा. चीनमध्ये अशा तऱ्हेने वाफवून रोटी करतात. वरील पोळ्या मोदकपात्रात न वाफवता लोणी लावून वाढता येतील.
हेही वाचा – ज्वारी, बाजरीची भाकरी विसरुन जाल! ट्राय करा मऊ लुसलुशीत कडधान्याची भाकरी
या चायनीज रोटीचा जेवनात समावेश केला असता आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही. ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी होते कळवा!