खवय्यांसाठी सुखाचा मार्ग हा पोटातून जातो. त्यामुळे खवय्ये आपल्या जीभेचे फार लाड करत असतात, तुम्ही अनेकवेळा रेस्टॉरंटमध्ये छोले खाल्ले असतील पण यामध्ये तेलाचा वापर अधिक असतो. त्यामुळे हे पदार्थ खाताना गरजेपेक्षा जास्त तेल शरीरात जातं, हे खरं आहे, पण म्हणून त्यासाठी हे पदार्थ सोडण्याची काही आवश्यकता नाही. हे पदार्थ खाऊनही सुदृढ राहाता येतं. यासाठी हे पदार्थ ऑइल फ्री करण्याचा उत्तम पर्याय आहे. आज आपण पाहुयात ऑइल फ्री छोले कसे बनावयचे.
ऑइल फ्री छोले साहित्य –
१ वाटी काबुली चना (रात्रभर भिजवलेले)
२ कप पाणी
१ मोठा कांदा
२ मध्यम आकाराचे टोमॅटो
लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून हळद पावडर
१मटीस्पून धने पावडर
१/२ टीस्पून हिंग
१/२ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून जिरे
१/२ टीस्पून साखर
चवीनुसार मीठ
१ टीस्पून लिंबाचा रस
ताजी कोथिंबीर
ऑइल फ्री छोले कृती –
- तेल नसलेले छोले बनवण्यासाठी प्रथम छोले रात्रभर किंवा ८-१० तास भिजत ठेवा. सकाळी तीन ते चार वेळा पाण्याने चांगले धुवावे. नंतर प्रेशर कुकरमध्ये छोले आणि पाणी टाका.
- आता प्रेशर कुकरमध्ये छोल्यासोबत संपूर्ण मसाले एका भांड्यात काढून घ्या. त्यात आले, लसूण, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, चिमूटभर मीठ व बेकिंग सोडा टाकून कुकर झाकून गॅसवर मध्यम आचेवर ठेवा.
- चार ते पाच शिट्ट्या काढा आणि गॅस बंद करा आणि कुकर थंड होईपर्यंत थांबा.
- आता एका छोट्या कढईत थोडे पाणी घ्या, त्यात भांड्यात काढलेला मसाला आणि कांदा टोमॅटो टाका. मिश्रणाची ग्रेवी होईपर्यंत शिजवा.
- छोले शिजल्यानंतर त्यावर कस्तुरी मेथी घाला आणि नंतर गॅस बंद करा. तुम्ही हे छोले पराठा, पुरी, बटुरे किंवा भातासोबत सर्व्ह करू शकता.
हेही वाचा – ‘बनाना कॉफी’ चवीसोबतच पौष्टिकतेनेही परिपूर्ण, का होतेय ‘ही’ कॉफी ट्रेंड
गरम गरम छोले फ्राय लिंबू, कांदा, कोथिंबीर व पुरीबरोबर द्यावेत, छान टेस्टी लागतात. तर आजच ट्राय करुन पाहा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.