Naralachi Vadi : काही दिवसांवर नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव किंवा समुद्रकिनारी राहाणारे लोक समुद्राची पूजा करतात आणि त्यांना नारळ अर्पण करतात. या शुभ दिवशी गोड काय खायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नारळी पौर्णिमेला तुम्ही नारळाच्या वड्या करू शकता. नारळाच्या वड्या अत्यंत पोष्टिक आणि तितक्याच टेस्टी असतात. नारळाच्या वड्या कशा बनवायच्या? ही सोपी रेसिपी जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य:

  • नारळ
  • साखर
  • तूप
  • वेलची पूड

हेही वाचा : Shravan 2023 : या श्रावणात बनवा ‘या’ दोन चविष्ट रेसिपी; पाहून तोंडाला पाणी सुटेल

कृती :

  • नारळ किसून घ्या
  • फक्त नारळाच्या पांढऱ्या भागाचा वापर करा.
  • एका कढईत दोन ते तीन चमचे तूप घ्या.
  • तूप गरम झाल्यावर त्यात किसलेला नारळ घाला
  • मंद आचेवर चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात साखर घाला.
  • मंद आचेवर मिश्रण ढवळत राहा
  • त्यात प्रमाणानुसार वेलचीपूड टाका.
  • मिश्रण घट्ट झाले की
  • एका खोल ताटाला तूप लावा आणि त्यात हे मिश्रण ओता अर्ध्या इंचाचा थर तयार करा
  • मिश्रण गरम असतानाच सुरीने वड्या पाडाव्यात.
  • मिश्रण थंड झाल्यानंतर या वड्या एका भांड्यात काढाव्या
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make coconut barfi naralachi vadi recipe sweets food for festival narali poornima in shravan month ndj