पोहे म्हणजे जवळपास प्रत्येक कुटुंबात केला जाणारा नाश्ता. आठवड्यातून एक-दोन वेळा हमाखास पोहे केले जातात. अचानक कोणी पाहूणे आले तर पटकन त्यांच्यासाठी आपण पोहे करतो. पोहे चविष्ट आहेत यात काही शंका नाही पण, नेहमी नेहमी पोहे खाऊन कधीतरी कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही पोह्याचे कटलेट करू शकता. ही रेसिपी चवीला अप्रतिम असून झटपट करता येत. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वाना हा पदार्थ आवडतो. मुलांच्या डब्यासाठी काहीतरी हेल्दी आणि वेगळा नाश्ता हवा असेल तर पोह्यांचे कटलेट उत्तम पर्याय आहे. पोह्यांचे कटलेट तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता. चला तर मग जाणून घ्या
पोह्याचे कटलेट रेसिपी
साहित्य –
जाड पोहे १ कप, बटाटा अर्धा, गाजर अर्धा, बीट अर्धे, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक हिरवी मिरची, लिंबाचा रस २ चमचे, मीठ चवीनुसार, तेल २ चमचे, धणे-जिरे पूड पाव चमचा
हेही वाचा – साधी पोळी नव्हे आता खाऊन पाहा चविष्ट केळ्याची पोळी! झटपट करु शकता तयार, लिहून घ्या रेसिपी
कृती –
पोहे पाण्यामध्ये १५-२० मिनिटे भिजत ठेवा, बटाटा, गाजर, बीट कूकरमध्ये शिजवून घ्या. पोह्यामधील पाणी काढून टाकून त्यात उकडलेल्या भाज्या घाला. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, हिरवी मिरची, मीठ, धणे जिरे पूड घालून मिश्रण एकजीव करा. त्याला कटलेटचा आकार देऊन तव्यावर भाजून घ्या.