Tandoori Soybean Recipes: सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सोया नगेट, दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने उदाहरणार्थ ब्रेड, बिस्किटे, सोयाबीनची भाजी, पुलाव आदी अनेक गोष्टी घरी बनवल्या जातात. तर काही बाजारात सुद्धा उपलब्ध असतात. पण, आज आपण एक अनोखा पदार्थ पाहणार आहोत; जो सोशल मीडियावर एका युजरने दाखवला आहे. या पदार्थाचे नाव आहे तंदुरी सोयाबीन. हा पदार्थ नेमका कसा बनवायचा याची सोपी कृती पाहून घेऊ.
साहित्य –
१. भिजवलेले सोयाबीन
२. दही
३. हळद
४.तिखट
५.काळी मिरी पावडर
६.चाट मसाला
७. मोहरीचे तेल
८.टोमॅटो केचअप
९. मीठ
व्हिडीओ नक्की बघा…
कृती –
१. एका भांड्यात सोयाबीन काही वेळ भिजत ठेवा व थोड्या वेळाने काढून बाजूला ठेवा.
२. त्यानंतर दुसरीकडे एक ताटात दही, हळद, तिखट, काळी मिरी, चाट मसाला, मीठ, टोमॅटो केचअप घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
३. नंतर या मिश्रणात वरून मोहरीचे तेल टाका.
४. मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्या.
५. नंतर या मिश्रणात सोयाबीन टाका.
६. त्यानंतर सोयाबीनच्या तुकड्यांना एअर फ्राय करून घ्या किंवा पॅनमध्ये परतून घ्या. जेणेकरून ते चवीला क्रिस्पी आणि टेस्टी राहतील.
७. तर अशाप्रकारे तुमचे तंदुरी सोयाबीन तयार.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @foodiecouple_us या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
सोयाबीनचे आरोग्यदायी फायदे –
कडधान्य, पालेभाज्या, डाळी यांच्या व्यतिरिक्त सोयाबीन हादेखील असा एक पदार्थ असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेक शाकाहारी लोकं सोयाबीनची भाजी आवडीने खातात. हडांना बळकटी देण्यासाठी आणि मजबूती वाढविण्यासाठी सोयाबीन फायदेशीर आहे. सोयाबीन खाल्ल्यामुळे हृदयासंबंधित आजार, वजन तर कोलेस्ट्रॉल, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करते.