फ्रेंच फ्राइजचं नावं ऐकलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. घराबाहेर पडताच मुलं फ्रेंच फ्राईज खायला हट्ट करतात. लहान मुलेच नाही तर मोठ्यांनाही फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. आज आपण ज्वारीचे फ्राइज घरच्याघरी कसे बनवायचे याची सोपी रेसिपी पाहणार आहोत. हे फ्राइज चवीला टेस्टी आणि हेल्दी देखील आहेत. जर तुम्ही तुमच्या मुलांना काहीतरी हेल्दी बनवून खायला देण्याचा विचार करत असाल तर ज्वारीचे फ्राईजहा एक चांगला पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया ज्वारीचे फ्राईज बनवण्याची सोपी रेसिपी..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य..

  • ज्वारीचा इडली रवा दीड वाटी
  • उकडून कुस्करलेला बटाटा एक वाटी
  • चाट मसाला एक छोटा चमचा
  • मीठ दोन छोटे चमचे
  • पेरी पेरी मसाला आवश्यकतेनुसार
  • पाणी अंदाजे सव्वा दोन वाट्या

( हे ही वाचा: महाशिवरात्रीच्या उपवासात ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा ‘साबुदाणा खिचडी’; एनर्जी दिवसभर टिकून राहील)

कृती

प्रथम एका भांड्यात पाणी घ्या आणि त्याला गॅसवर उकळी येऊ द्या. त्यात ज्वारीचा इडली रवा, मीठ, चाट मसाला घाला आणि तीन ते चार मिनिटं शिजू द्या. त्यानंतर त्यात कुस्करलेला बटाटा आणि चव पाहून लागेल तसं आणखी मीठ आणि चाट मसाला घालून मिश्रण थंड झाल्यावर चांगले मळून घ्या. त्याचे लहान लहान गोळे करून लाटून घ्या आणि त्याचे आयताकृती आकारात सुरीने फ्राईज कापून घ्या. हे फ्राईज उकळत्या तेलात टाकून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. तळलेले फ्राईस बटर पेपरवर काढून घ्या आणि त्यावर पेरी पेरी मसाला टाका ज्वारीचे फ्राईस खाण्यासाठी तयार आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make crispy jwari french fries at home know easy recipe gps