मेदूवडा साऊथ इंडियन फूड असले तरीही जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात ही आवडीने खाल्ला जातो. भारताच्या विविध भागात हा पदार्थ नाश्त्यामध्ये समाविष्ट केला जातो. झटपट असा होणारा हा पदार्थ कुरकुरीत आणि चवीला स्वादिष्ट आहे. मेदुवडा खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा सांबार सोबत खाल्ला जातो. आज आम्ही तुम्हाला फक्त दोन कप उडीद डाळीचा वापर करून घरच्या घरी मेदुवडा कसा बनवता येईल याबद्दल सांगणार आहोत. हा मेदुवडा फक्त तीस मिनिटात बनवून तयार होतो तर जाणून घेऊया यासाठी लागणाऱ्या साहित्य आणि कृती..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • उडीद डाळ २ कप
  • किसून घेतलेलं खोबरं ३ ते ४ कप
  • आलं एक इंच तुकडा
  • हिरव्या मिरच्या ४ ते ५
  • कोथिंबीर चिरून घेतलेली
  • पाणी गरजेनुसार
  • गरम पाणी दोन कप
  • तेल
  • मीठ

( हे ही वाचा: वडापाव सोबत दिली जाणारी लाल सुकी लसूण चटणी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी)

myadaptedkitchen या इंस्टाग्राम पेजवरून मेदू वडा झटपट कसा तयार करायचा ते पाहणार आहोत..

कृती

  • एका भांड्यात उडीद डाळ घेऊन ती स्वच्छ धुऊन घ्यावी
  • त्यानंतर थोडे गरम पाणी घ्यावे आणि त्यात दोन घेतलेली उडीद डाळ अर्धा तास भिजत ठेवावी.
  • आता मिक्सरच्या भांड्यात किसलेलं खोबरं हिरव्या मिरच्या आणि आलं घालून मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यावं.
    त्यानंतर अर्धा तास झाल्यावर भिजवलेली उडीद डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी.
  • यानंतर त्यात किसलेलं खोबरं आलं हिरव्या मिरच्या यांचं वाटून घेतलेलं मिश्रण घालावं
  • आता या एकत्रित केलेल्या मिश्रणात कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावं आणि मिश्रण एकजीव करून घ्यावं.
  • त्यानंतर दोन्ही हाताला तेल किंवा पाणी लावून पिठाला मेदुवड्याचा आकार द्यावा.
  • त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मेदुवडे चांगले भाजून घ्यावेत.
  • तुम्ही हे गरमागरम मेदू वडे खोबऱ्याची चटणी किंवा सांबार सोबत खाऊ शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make crispy medu vadas in 30 minutes know easy recipe gps