सहसा कबाब म्हटले की नॉनव्हेज आठवतं पण तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही व्हेज कबाबसुद्धा बनवू शकता. काही दिवसांवर आषाढी एकादशी आहे. जर तुम्हाला उपवासाला कबाब खायची इच्छा असेल तर तुम्ही बटाटा कबाब ट्राय करू शकता. शिंगाड्याचे पिठ आणि दही इत्यादी उपवासाला चालणाऱ्या साहित्यापासून तुम्ही हे टेस्टी कबाब बनवू शकता. जाणून घेऊ या बटाटा कबाब कसे बनवायचे?

साहित्य

  • बटाटे : 1/2 किलो
  • शिंगाड्याचे पिठ : 1 वाटी
  • दही : 1/2 कप
  • हिरवी मिरची : 4
  • हिरवे धणे : 2 चमचे
  • आले : 1 इंच तुकडा
  • जिरे पावडर : 1/2 टीस्पून
  • रॉक मीठ : चवीनुसार
  • शेंगदाणा तेल : तळण्यासाठी
  • सुका मेवा

हेही वाचा : Vangi Bhaat Recipe : असा बनवा खमंग चमचमीत वांगी भात, जाणून घ्या ही सोपी रेसिपी

How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Korean Maggie Recipe
एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
How to make Methi Kadhi marathi Methi Kadhi recipe marathi Methi Kadhi recipe
थंडीत वाफाळत्या भातासोबत खा पौष्टिक ‘ मेथीची कढी’! खास रेसिपी

कृती :

  • फराळी बटाटा कबाब बनवण्यासाठी प्रथम बटाटे उकळवा आणि नंतर सोलून घ्या.
  • त्यानंतर एका भांड्यात बटाटे चांगले मॅश करा नंतर हिरवी मिरची, (तुम्ही उपवासाला खात असल्यास) कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
  • त्यानंतर आलं ठेचून घ्या.आता मॅश केलेल्या बटाट्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची, धणे आणि जिरे पूड घाला आणि चांगले मिसळा.
  • यानंतर त्यात चेस्टनट म्हणजेच शिंगाड्याचे पीठ आणि पाणी मिसळा. एक मिनिट एकजीव करून घ्या.
  • आता मिश्रणाचे समान प्रमाणात गोळे तयार करा. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही कबाब गोलाकार बनवू शकता किंवा अंडाकृती हवे असतील तर त्याला तास आकार द्यावा.
  • मिश्रणातून सर्व बटाट्याचे कबाब तयार केल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवा.
  • आता एक कढई घ्या आणि त्यात तेल टाका. तेल मध्यम आचेवर गरम करा आणि गरम झाल्यावर कढईच्या क्षमतेनुसार बटाट्याचे कबाब घालून तळून घ्या.
  • कबाब दोन्ही बाजूंनी वळवून सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • यानंतर बटाट्याचे कबाब एका प्लेटमध्ये काढा. हे कबाब तुम्ही दह्यासोबत सर्व्ह करू शकता.

Story img Loader