सहसा कबाब म्हटले की नॉनव्हेज आठवतं पण तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही व्हेज कबाबसुद्धा बनवू शकता. काही दिवसांवर आषाढी एकादशी आहे. जर तुम्हाला उपवासाला कबाब खायची इच्छा असेल तर तुम्ही बटाटा कबाब ट्राय करू शकता. शिंगाड्याचे पिठ आणि दही इत्यादी उपवासाला चालणाऱ्या साहित्यापासून तुम्ही हे टेस्टी कबाब बनवू शकता. जाणून घेऊ या बटाटा कबाब कसे बनवायचे?
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहित्य
- बटाटे : 1/2 किलो
- शिंगाड्याचे पिठ : 1 वाटी
- दही : 1/2 कप
- हिरवी मिरची : 4
- हिरवे धणे : 2 चमचे
- आले : 1 इंच तुकडा
- जिरे पावडर : 1/2 टीस्पून
- रॉक मीठ : चवीनुसार
- शेंगदाणा तेल : तळण्यासाठी
- सुका मेवा
हेही वाचा : Vangi Bhaat Recipe : असा बनवा खमंग चमचमीत वांगी भात, जाणून घ्या ही सोपी रेसिपी
कृती :
- फराळी बटाटा कबाब बनवण्यासाठी प्रथम बटाटे उकळवा आणि नंतर सोलून घ्या.
- त्यानंतर एका भांड्यात बटाटे चांगले मॅश करा नंतर हिरवी मिरची, (तुम्ही उपवासाला खात असल्यास) कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
- त्यानंतर आलं ठेचून घ्या.आता मॅश केलेल्या बटाट्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची, धणे आणि जिरे पूड घाला आणि चांगले मिसळा.
- यानंतर त्यात चेस्टनट म्हणजेच शिंगाड्याचे पीठ आणि पाणी मिसळा. एक मिनिट एकजीव करून घ्या.
- आता मिश्रणाचे समान प्रमाणात गोळे तयार करा. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही कबाब गोलाकार बनवू शकता किंवा अंडाकृती हवे असतील तर त्याला तास आकार द्यावा.
- मिश्रणातून सर्व बटाट्याचे कबाब तयार केल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवा.
- आता एक कढई घ्या आणि त्यात तेल टाका. तेल मध्यम आचेवर गरम करा आणि गरम झाल्यावर कढईच्या क्षमतेनुसार बटाट्याचे कबाब घालून तळून घ्या.
- कबाब दोन्ही बाजूंनी वळवून सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- यानंतर बटाट्याचे कबाब एका प्लेटमध्ये काढा. हे कबाब तुम्ही दह्यासोबत सर्व्ह करू शकता.
First published on: 22-06-2023 at 13:18 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make crispy potato kebab recipe for fast ashadhi ekadashi 2023 ndj