How To Make Crispy Roti Chinese Bhel : शाळा, कॉलेज ते अगदी ऑफिसच्या कर्मचाऱ्यांपर्यंत चायनीज भेळ खायला खायला सगळ्यांनाच आवडते. चायनीज भेळचं नाव जरी काढलं तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पण, मुलांना चायनीस पदार्थांपासून कसं लांब ठेवायचं याचा प्रयत्न घरातील प्रत्येक आई करत असते. तर , आज सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत चायनीज भेळला घरगुती ट्विस्ट दिला आहे. @myflavourfuljourney या इन्स्टाग्राम युजरने पोळीची चायनीज भेळ बनवली आहे, जी तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी व मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता. तर चला जाणून घेऊन ‘कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ’ (Crispy Roti Chinese Bhel) कशी बनवायची ते…

साहित्य (Crispy Roti Chinese Bhel Ingredients) :

१. पोळ्या

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

२. आलं, लसूण

३. कांदे

४. गाजर

५. शिमला मिरची

६. कोबी

७. शेजवान सॉस

८. सोया सॉस

९. काळी मिरी पावडर

१०. तेल

हेही वाचा…Leftover Rice Recipe : रात्री उरलेला भात फेकून देताय? मग थांबा! मोजकं साहित्य वापरून करा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (How To make Crispy Roti Chinese Bhel) :

१. सर्वप्रथम काही पोळ्या घ्या.

२. त्यांना रोल करा आणि नूडल्स प्रमाणे बारीक कापून घ्या.

३. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्या आणि ते कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या किंवा एअर फ्राय सुद्धा करू शकता.

४. कढईत थोडं तेल घाला. त्यात आलं, लसूण बारीक परतून घ्या.

५. नंतर त्यात कांदे, गाजर, शिमला मिरची, कोबी अशा सर्व भाज्या घाला, मिक्स करा.

६. त्यानंतर शेजवान सॉस, सोया सॉस आणि काळी मिरी पावडर, थोडे मीठ घाला.

७. मिश्रण व्यवस्थित मिक्स करा त्यात कुरकुरीत भाजून घेतलेल्या पोळीचे तुकडे घाला.

८. मिश्रण दोन ते तीन मिनिटे थंड होऊ द्या.

९. नंतर सर्व्ह करा.

१०. अशाप्रकारे तुमची ‘पोळीची चायनीज भेळ’ (Crispy Roti Chinese Bhel) तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @myflavourfuljourney या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.