Sabudana Vada : सध्या श्रावण महिना सुरू आहे. या महिन्यात अनेकजण उपवास करतात. नेहमी नेहमी साबुदाणी खिचडी करुन कंटाळला असाल तर तुम्ही साबुदाणा वडा बनवू शकता पण अनेक लोकांची तक्रार असते की साबुदाणा वडा कुरकुरीत होत नाही. टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला ही सोपी रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे साबुदाणा वडा खूप स्वादिष्ट आणि कुरकुरीत होईल. आजच ही रेसिपी नोट करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :-

  • साबुदाणा
  • उकळलेले बटाटे
  • हिरव्या मिरच्या
  • तेल
  • शेंगदाण्याचा कूट
  • लिंबाचा रस
  • जिरे
  • मीठ

हेही वाचा : Raw Banana Chakali : उपवासाला खा कच्च्या केळीच्या चकल्या, ही सोपी रेसिपी नोट करा

कृती

  • साबुदाणा ४ ते ५ तासांसाठी पाण्यात भिजवा.
  • उकळलेले बटाटे नीट कुस्करून घ्या.
  • हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करुन घ्या
  • भिजवलेला साबुदाणे, बटाटे, मिरच्यांची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, जिरे, लिंबाचा रस आणि मीठ घाला
  • सर्व मिश्रण एकत्र करा
  • या मिश्रणाचे छोटे गोळे करुन हातावर थापा.
  • कढईत तेल गरम करा आणि मंद आचेवर हे वडे तळा
  • शेंगदाण्याच्या चटणीबरोबर हे वडे तुम्ही खाऊ शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make crispy sabudana vada note down tips and recipe ndj
Show comments