अनेकदा लहान मुलांना हिरव्या भाज्या फारशा आवडत नाहीत. विशेषतः मटार. मटार सारख्या भाज्या मुलं सहज आपल्या ताटातून बाजूला काढतात. मात्र इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @marathikitchen नावाच्या अकाउंटने शेअर केली ही कुरकुरीत मटार रोल रेसिपी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. कसा बनवायचा हा पदार्थ पाहूया.
साहित्य
१ कप मटार
१ उकडलेला बटाटा
१ बारीक चिरलेला कांदा
१ चमचा धणे
१ चमचा बडीशेप
१/२ चमचा जिरे
२ लवंग
४ मिरी
१ चमचा कॉर्न फ्लॉवर
४ लसूण पाकळ्या
२-३ हिरवी मिरची
दालचिनी तुकडा
आले
हिंग
हळद
ब्रेड
कृती
- सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी तापत ठेवा. त्यामध्ये ताजे मटार पाच मिनिटांसाठी वाफवून घ्या.
- आता एका पॅनमध्ये धणे, बडीशेप, लवंग, मिरी, जिरे आणि दालचिनी असे सर्व मसाले छान बाजून घ्या.
- मसाले भाजल्याचा खमंग गंध आल्यानंतर पॅनमधील सर्व गोष्टी मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या.
- आता यामध्ये हिरव्या मिरच्या, आले आणि लसूण घालून छान वाटण बनवून घ्या. तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी-जास्त करा.
- यानंतर पुन्हा एक खोलगट पॅनमध्ये थोडे तेल तापवून घ्या.
- तेल तापल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्या.
- कांदा काही वेळ परतल्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद आणि तयार केलेले वाटण घालून घ्या.
- सर्व पदार्थ व्यवस्थित ढवळून घ्या.
- आता सुरवातीला वाफवलेले मटारदेखील मिक्सरमध्ये भरभरीत असे वाटून पॅनमध्ये घाला.
- सर्वात शेवटी उकडलेला बटाटा कुस्करून तयार होणाऱ्या मटार रोलच्या सारणात घालून घ्या.
- चवीनुसार मीठ घालून सर्व पदार्थ व्यवस्थित शिजवून घ्या.
- पदार्थ शिजल्यानंतर गॅस बंद करा.
- मटार रोल बनवण्यासाठी ब्रेडच्या कडा कापून टाका.
- आता ब्रेडला लाटण्याच्या साहाय्याने हलके लाटून घ्या.
- नंतर ब्रेडवर अगदी हलक्या हाताने पाणी शिंपडून घ्या.
- लाटलेल्या ब्रेडमध्ये तयार केलेले मटाराचे सारण भरून घ्या.
- ब्रेडमध्ये सारण भरू झाल्यावर तो रोलकरून बंद करून त्याला ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून घ्या.
- ब्रेड व्यवस्थित बंद होण्यासाठी कॉर्न फ्लॉवर पाण्यात घोळवून ब्रेडच्या कडांना लावून, ब्रेड बंद करा.
- आता पुन्हा एका खोलगट पॅनमध्ये तेल तापवत ठेवा.
- तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले ब्रेड रोल्स हलक्या हाताने सोडा.
- मटार रोल सोनेरी रंगाचे झाल्यानंतर त्यानं तेलातून बाहेर काढा.
- तयार मटार रोल टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर खाता येऊ शकतात.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @marathikitchen नावाच्या अकाउंटने या स्वादिष्ट रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला ९८.५K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.