उन्हाळा आला आहे. कडक उन्हाची झळ आता सर्वांनाच जाणवतेय. बाजारात आता काकडी देखील सहज उपलब्ध होत आहे. काकडी खाण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत विशेषत: उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये पाण्याची कमतरता होत असते त्यामुळे अनेकदा काकडीमध्ये नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असते. त्यामुळे बऱ्याच वेळा डॉक्टर काकडी खाण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे तुमच्या पोटाला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात लोकांना अधिकाधिक काकडी खायला आवडते. पण जर तुम्हाला काकडी खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही त्यापासून तयार केलेले थंड सूप करून पाहू शकता.
उन्हाळ्यामध्ये काकडी, दही आणि ताजे मसाले घालून तयार केलेल्या स्वादिष्ट आणि निरोगी थंड सूपपेक्षा चांगले काय असू शकते का? असे काही सूप आहेत जे उन्हाळ्यासाठी उत्तम असतात आणि एक परिपूर्ण हलका आहार ठरु शकतात. तसेच हे सूप उकडलेले चणे वापरून तयार केले जाते, जे एक मलईदार पोत देते आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी हे उत्तम आहे कारण हे सूप प्रथिनेयुक्त आहे, जे मधुमेहाने ग्रस्त लोकांसाठी देखील चांगले आहे. ही रेसिपी तुमच्या चवीनुसार बदलता येते. चला तर मग झटपट काकडीचे थंड सूप तयार करण्याची रेसिपी जाणून घेऊ या.
हेही वाचा : आंबा पाण्यात भिजवून मगचं खा, जाणून घ्या यामागचे फायदे आणि तोटे
काकडीचे थंड सूप
साहित्य :
वाटीभर भिजवलेले चणे, ३ -४ काकड्या, २ हिरव्या मिर्ची, एक वाटी दही, २-४ काळी मिरी, चवीनुसार मिठ, कोथिंबिरी
कृती :
सर्व प्रथम चणे धुवून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी पाणी काढून टाका आणि 3-4 शिट्ट्या देऊन प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्या. काकडी धुवा, सोलून घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा.
ब्लेंडर घेऊन त्यात काकडी, हिरवी मिरची, किसलेली काकडी, चणे, दही, काळी मिरी, मीठ आणि कोथिंबीर घाला. मिश्रण घट्ट क्रिमी सूप होईपर्यंत मिसळत रहा.
एक पॅन घ्या आणि लसूण सह ऑलिव्ह ऑईल घाला, चांगले तळून घ्या आणि सूपवर घाला, चांगले मिसळा. तुमच्या आवडीनुसार सजवा आणि सूपचा आनंद घ्या.