होलीका दहन झाल्यानंतर उन्हाळा सुरु होतो. मार्च महिन्यातच तापमानाचा पारा वाढलाय. या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होते, दुपारी 12, 1 च्या दरम्यान तर बाहेर जाणं शक्यतो टाळाच. या उष्णतेच्या त्रासामुळे आपण थंड पाणी, थंड सरबता यांचं सेवन मोठ्याप्रमाणात करत असतो. उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी आपण शितपेय घेत असतो. यावेळी केमिकलयुक्त कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा नैसर्गिक आणि घरगुती थंड पेय घेऊ शकता. लिंबू सरबत, कोकम सरबत हे आपण नेहमीच पित असतो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय थंड गारेगार काकडीचं सरबत. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचं काकडीचं थंडगार सरबत.

काकडी सरबत साहित्य –

  • 2 लहान किंवा १ मोठी गावठी काकडी
  • 2 टेबलस्पून लिंबाचा रस
  • 1/2 टीस्पून काळे मीठ
  • ३.५ टेबलस्पून साखर. कमी-जास्त करु शकता
  • 3-4 बर्फाचे खडे
  • थंड पाणी

हेही वाचा- (बेसन कशाला? हेल्थी मुगाचा ढोकळा बनवुया! पाहा झटपट सोपी मराठी रेसिपी)

काकडी सरबत कृती –

काकडी सोलून तुकडे करा, दोन लिंबांचा रस काढा, आलं सोलून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये काकडीचे तुकडे, लिंबाचा रस, साखर, थोडे काळे मीठ, आलं, जीरं पावडर, दहा-बारा पानं कोथिंबीर किंवा पुदिना घाला. आता यात एक ग्लास थंड पाणी ओता आणि सगळं मिश्रण बारीक होईपर्यंत फिरवा आणि गाळून घ्या. त्यानंतर काकडीचा सरबत एका ग्लासमध्ये काढून बर्फाचे दोन ते तीन क्यूब टाकून थंडगार काकडी सरबतचा स्वाद घ्या..गारेगार सरबत भर उन्हात अतिशय उपयुक्त ठरतो.

काकडी त्वचेसाठी फायदेशीर

काकडी शरीरासाठी जितका फायदेशीर आहे तितकीच ती त्वचेसाठीही फायदेशीर आहे. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने शरीर हायड्रेट राहण्यासाठी काकडी खाणे फायदेशीर ठरते. तसेच त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काकडी उपयुक्त असते. काकडीचे पाणी चेहऱ्यावर लावणे, डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवणे. यामुळे त्वचेला गार तर वाटतेच, पण त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत होते. तुम्ही काकडीचा फेसपॅक घरच्या घरी करूनही त्वचेची काळजी घेऊ शकता.

तर आजच ट्राय करुन पाहा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.

Story img Loader