Dahi Kabab Recipe In Marathi : कोणतीही पार्टी किंवा गेटटुगेदर असो आपल्याकडे मऊशार कबाब आणि त्याबरोबर टोमॅटोची किंवा हिरव्यागार पुदिन्याची चटणी, कांदा, लिंबू शिवाय हे कार्यक्रम पूर्णच होऊच शकत नाही. या कबाबची निव्वळ आठवण काढताच भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटते. हॉटेलमध्ये गेल्यावर कधीकधी आपण स्टार्टर्ड म्हणून सुद्धा हे कबाब नक्की मागवतो. तर फक्त हॉटेल किंवा पार्टीला गेल्यावरच हे कबाब खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी सुद्धा हे कबाब बनवू शकता. सोशल मीडियावर एका युजरने दही कबाब हा पदार्थ कसा बनवायचा हे दाखवलं आहे. तर चला पाहुयात दही कबाब बनवण्याची साहित्य आणि कृती (Dahi Kabab Recipe) …

साहित्य (Dahi Kabab Ingredients) :

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!

१. अर्धी वाटी दही (हंग कर्ड)

२. एक उकडलेला किसलेला बटाटा

३. ४० ग्रॅम किसलेले पनीर

४. एक चिरलेला कांदा

५. अर्धी चिरलेली सिमला मिरची

६. हिरवी मिरची

७. उकडलेले स्वीट कॉर्न

८. लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला

९. ब्रेड क्रम्स

१०. तेल

हेही वाचा…Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (How To Make Dahi Kabab) :

१. अर्धी वाटी Hung दही, एक उकडलेला, किसलेला बटाटा, ४० ग्रॅम किसलेले पनीर, एक चिरलेला कांदा, अर्धी चिरलेली सिमला मिरची, हिरवी मिरची आणि उकडलेले स्वीट कॉर्न घ्या.

२. एक चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घाला.

३. एक चमचा कॉर्नफ्लोअर पीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.

४. तळहातावर तेल लावा आणि कबाबचा कोणताही आकार बनवा.

५. ब्रेड क्रम्समध्ये बुडवून घ्या.

६. त्यानंतर मध्यम आचेवर तळून घ्या.

७. अशाप्रकारे तुमचा दही कबाब तयार (Dahi Kabab Recipe) आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.तुम्ही हा पदार्थ पाहुण्यांसाठी, कुटुंबातील सदस्यांच्या नाश्त्यासाठी तर लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता.