मऊ, हलका आणि स्वादिष्ट चवीचा दहीवडा उन्हाळ्यात खाणे अनेकांना पसंत असते. मात्र हॉटलेमध्ये मिळणारा दहीवडा किंवा त्यामधील दही हे प्रचंड गोड असते. ज्यांना साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल त्यांच्यासाठी तर हा पदार्थ जवळपास वर्ज्य असतो. मात्र तुम्हाला जर घरच्याघरी अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यामध्ये दहीवडा तयार करता आला तर?

सोशल मीडियावर sm.katt नावाच्या अकाउंटने मुगाच्या डाळीचा वापर करून हलका आणि खुसखुशीत दहीवड्याची एक भन्नाट रेसिपी शेअर केली आहे. चला रत मग काय आहे त्याचे साहित्य आणि कृती पाहूया.

मुगाच्या डाळीचा दहीवडा :

साहित्य

मुगाची डाळ
दही
मिरची
आले
कोथिंबीर
मीठ
बेकिंग सोडा
जिरे पूड
धणे पूड
लाल तिखट
पिठीसाखर
पाणी
तेल

हेही वाचा : Lunch box recipe : ‘चवळी मसाला’ सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी; कशी बनवावी पाहा

कृती

  • सर्वप्रथम मुगाची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून तिला २ ते ३ तास [अंदाजे] पाण्यात भिजवून ठेवा.
  • आता भिजवलेली डाळ एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या.
  • डाळीबरोबर एक हिरवी मिरची आणि आल्याचे दोन छोटे तुकडे घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण बंद करा व डाळ चांगली बारीक वाटून घ्या.
  • मुगाची डाळ बारीक वाटून झाल्यावर तिला एका पातेल्यामध्ये काढून घ्यावे.
  • आता या वाटलेल्या डाळीमध्य चवीनुसार मीठ आणि चिमूटभर कायचा सोडा / बेकिंग सोडा घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.
  • मुगाच्या भजीचे / वड्याचे मिश्रण तयार आहे.
  • गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तळणीसाठी तेल तापत ठेवा.
  • तेल चांगले तापले कि चमच्याच्या मदतीने कढईत तयार केलेले मुगाच्या भजीचे मिश्रण सोडा.
  • आता मुगाची चांगली खरपूस सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
  • भाजी चांगली खुसखुशीत झाली कि तिला थंड पाण्यात किंवा बर्फाच्या पाण्यामध्ये सोडा.
  • आता भजी हाताने दाबून तिने शोषून घेतलेले पाणी काढून टाका आणि सर्व भजी एका बाऊलमध्ये काढून घ्यावी.
  • मुगाच्या भजी / वड्यांवर घालण्यासाठी दही तयार करू.
  • एका बाऊलमध्ये दही घेऊन ते चांगले फेटून घ्यावे.
  • फेटलेल्या दह्यात धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट, चवीपुरते मीठ, चवीपुरती पिठीसाखर घालून पुन्हा एकदा दही फेटून घ्यावे.
  • आता तयार झालेले दही आपल्या मुगाच्या भजीवर टाकून घ्या.
  • मुगाच्या दहीवड्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • तयार आहे आपला झटपट तयार होणारा हलका-फुलका दहीवडा.

हेही वाचा : World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @sm.katta नावाच्या अकाउंटने ही भन्नाट रेसिपी शेअर केली आहे. या रेसिपी व्हिडिओला आत्तापर्यंत १७१K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader