[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्ताच्यासारखी पंजाबी, चायनीज, इटालियन, साउथ इंडियन हॉटेलं फोफावली नव्हती आणि दर वीकेंडला घरी `चूल बंद` आंदोलन करण्याची प्रथा आली नव्हती, तेव्हाची, म्हणजे फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा जी काही थोडीफार हॉटेलं होती, त्यात उडपी हॉटेलांचं प्रमाण जास्त होतं आणि आत्ताच्या `पिझ्झा`च्या जागी तेव्हा मसाला डोसा होता. बाहेर खाण्याची चटक लावली, ती बटाटेवडा, मेदूवडा, इडली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डोशांनीच. डोसा खायचा तर तो मसाला डोसा, हे समीकरण डोक्यात पक्कं होतं. कारण घरी डोसा किंवा त्यासदृश धिरडं, थालीपीठ, आम्लेट, हे प्रकार खायला मिळत होते. बाहेर कधीतरीच खायला मिळायचं आणि ते मिळेल तेव्हा घसघशीत काहीतरी खाऊन घ्यावं, हे ठरलेलं होतं. डिशमध्येही न मावणारा मसाला डोसा आणि त्यात घातलेली उभा कांदा चिरून केलेली बटाट्याची भाजी, हे आकर्षण जबरदस्त होतं. (ती भाजी त्या डोशाच्या आत कशी जाते, हेही त्या वयात एक कोडंच वाटायचं.) असाच आनंद मिळायचा दहीवडा खाताना. चटपटीत दही आणि त्यात भिजलेला खुसखुशीत वडा, हे समीकरणच भारी वाटायचं. अर्थात, अनेकदा दहीवडा म्हणून खूप उत्साहानं आर्डर दिल्यानंतर, फ्रीजमध्ये ठेवलेलं गारढोण काहीतरी समोर यायचं, तेव्हा भ्रमनिरास व्हायचा, तो वेगळाच. पण असे प्रसंग क्वचित. एकूण या दाक्षिणात्य पदार्थांची ओळख सगळ्यात आधी झाली आणि त्यांच्यावर कायमचं प्रेम जडलं. वडे, डोसे करण्यासाठी तांदूळ, डाळ वगैरे रात्रभर भिजवून ठेवावी लागते, नंतर ती वाटून त्यावर बरेच संस्कार करावे लागतात, तेव्हा कुठे पाच मिनिटांत डोसा किंवा वडा तयार होतो, हे खूप उशिरा कळलं. तरीही त्या पदार्थावरचं प्रेम कमी झालं नाही आणि कधी होणार नाही. तर, एवढं रुचिदाक्षिण्य दाखवल्यानंतर आज दहीवड्याची रेसिपीही बघूया

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • अर्धी वाटी उडदाची डाळ
  • पाव वाटी मुगाची डाळ
  • १/४ वाटी ओल्या खोबर्‍याचे पातळ तुकडे
  • चवीपुरते मीठ
  • २ वाटी पातळ ताक
  • तळण्यासाठी तेल
  • दीड वाटी घट्ट दही
  • ५-६ टेस्पून साखर
  • मिरपूड
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • कोथिंबीर

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • उडीद डाळ आणि मुगाची डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी.
  • पाणी काढून टाकावे.
  • पाणी न घालता दोन्ही डाळी एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. (गरज वाटल्यास 1 ते 2 चमचेच पाणी घालावे)
  • वाटलेले मिश्रण आपल्याला दाटसरच हवे आहे. नंतर त्यात मीठ आणि खोबर्‍याचे पातळ काप घालावेत.
  • कढईत तेल गरम करा. मध्यम आचेवर गोल आकारात किंवा मेदूवड्याच्या आकारात वडे तळून घ्यावे. वड्यांचा आकार खुप मोठा ठेवू नये.
  • पातळ ताकात थोडी साखर आणि चवीपुरते मीठ घालावे. यामध्ये तळलेले वडे साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावे.
    तोवर वरून घालायचे दही तयार करून घ्यावे. भांड्यात घट्ट दही घ्यावे, रवीने नुसतेच घुसळून घ्यावे. मग किंचित पाणी घालून आवश्यक तेवढा पातळपणा द्यावा. त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालावे. ढवळून घ्यावे. आणि थोडावेळ फ्रीजमध्ये गार करण्यास ठेवावे.
  • सर्व्ह करताना ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घालावेत. त्यावर दही घालून वरती चाट मसाला, मिरपूड, कोथिंबीर आणि लाल तिखट घालावे.

[/one_third]

[/row]