नाश्त्यात नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी चटपटीत खावंस वाटतं असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी घरच्याघरी आणि तेही फक्त २ मिनिटात इन्स्टंट दही वडा कसा बनवायचा याची भन्नाट रेसिपी सांगणार आहोत. दही वडा खायची इच्छा प्रत्येकाची असते. पण याला बनवण्याची प्रक्रिया थोडी कठीण असते. पण आज आम्ही जी इन्स्टंट रेसीपी सांगणार आहोत त्याच्या माध्यमातून तुम्ही फक्त काही वेळातच झटपट दही वडा बनवू शकता. चहासोबत खाल्ला जाणारा बटर वापरून हा दही वडा बनवता येईल. चला तर मग जाणून घेऊया..
साहित्य
- ५०० ग्रॅम दही
- साखर १ टीस्पून
- मीठ चवीनुसार
- ६ बटर
( हे ही वाचा: खमंग आणि खुसखुशीत पुरणपोळी कशी बनवावी? जाणून घ्या सोपी रेसिपी)
कृती
एका भांड्यात दही घ्या आणि त्यात मीठ अर्धा टीस्पून, साखर १ टीस्पून घालून मिश्रण एकजीव करा. यानंतर त्यात ६ भिजवलेले बटर घाला. बटर २० सेकंद पाण्यात ठेवा आणि बाहेर काढा. त्यानंतर एका भांड्यात बटर, दही, हिरवी चटणी, जिरे पावडर, लाल तिखट, गोलगप्पा मसाला, चिंच गूळाची चटणी एकत्र करा आणि हे इस्टंट दही वडे तुमच्या कुटुंबियांना सर्व्ह करा.