सध्या श्रावण महिन्यात अनेकजण मोठ्या श्रद्धने उपवास करतात. अशात साबुदाणा खिचडी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही उपवासाला वेगळं काही करू शकता. तुम्ही उकळलेले बटाटे, राजगिरा आणि शिंगाडा पीठापासून दहिवडा बनवू शकता. उपवासासाठी हा एक चांगला पर्याय आहे. हा उपवासाचा दहिवडा कसा बनवायचा, यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.

साहित्य

  • उपवासाची भाजणी
  • राजगिरा पीठ
  • शिंगाडा पीठ
  • उकळलेले बटाटे
  • हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
  • दही
  • शेंगदाण्याचा कूट
  • जिरे
  • आले
  • तिखट
  • मीठ
  • तूप

हेही वाचा : Sabudana Chivda : श्रावणात बनवा टेस्टी साबुदाणा चिवडा, ही रेसिपी नोट करा

Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Crunchy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home
Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती

कृती

  • उकळलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, राजगिरा आणि शिंगाडा पीठ एकत्र करा आणि त्यात तिखट, मीठ टाका
  • हे पीठ चांगल्याने मळून घ्या.
  • या मिश्रणाचे लहान गोळे करा.
  • कढईत तूप गरम करा आणि हे गोळे तळून घ्या.
  • नंतर एका भांड्यामध्ये दही घ्या.
  • त्यात मिरची, बारीक केलेले आले आणि मीठ घाला.
  • दही चांगले घुसळून घ्या.
  • यात तळलेले गोळे टाका आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका
  • थोड्या वेळानंतर तुम्ही हा उपवासाचा दहिवडा सर्व्ह करू शकता.