Homemade Masala Recipe : अनेकांना स्वयंपाक करण्याची खूप आवड असते, ते रोज काही ना काही नवीन पदार्थ ट्राय करत असतात. अशावेळी जेवणाची चव वाढवणारे काही मसाले तुमच्या किचनमध्ये असणे फार गरजेचे असते. गोडा मसाला, काळा मसाला, कांदा-लसूण मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला हे मसाले जेवणाची चव वाढवतात. परंतु अनेकजण हे मसाले बाहेरुन विकत घेतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला यातील तीन प्रकारचे मसाले घरच्या घरीच कसे सोप्या पद्धतीने बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर या मसाल्यांची रेसिपी जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गोडा मसाला

साहित्य: २० ग्रॅम पांढरे तीळ, खसखस, तमालपत्र, जावेत्री, शहाजिरे, हिंगाचा खडा, दालचिनी, काळे मिरी, लवंग, त्रिफळा, २५० ग्रॅम धणे, १० ग्रॅम सुके खोबरे, दगडफुल, मोठी वेलची, तेल

कृती

सर्वप्रथम एका कढईत धणे, तीळ, शहाजिरे वेगवेगळे भाजून एका प्लेटमध्ये वेगळं करुन ठेवा. यानंतर कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल गरम करुन त्यात दालचिनी, मसाला वेलची, स्टारफुल, जावेत्री, लवंग, काळेमिरी,त्रिफळा, खडा हिंग, तमालपत्र, दगडफुल असे सगळे एक एक करुन तळून घ्या. हे सर्व पदार्थ भाजून एकत्र न ठेवता वेगवेगळे ठेवा.

आता सर्व मसाले थंड झाल्यानंतर सर्व साहित्य मिक्स करा आणि वाटून घ्या. शक्यतो एक एक साहित्य वाटून मग तुम्ही सगळे साहित्य एकत्र केल्यास मसाल्याला चांगली चव येते. पण हे वेळ खाऊ काम असल्याने तुम्ही सर्व साहित्य नीट भाजून मग एकत्र वाटून घेतलं तरी चालेल.

कांदा – लसून मसाला

साहित्य: ५० ग्रॅम धणे, बेडगी मिरची, लाल सुकी मिरची, लसूण, २० ग्रॅम सुकं खोबरं, १० ग्रॅम जीरे, शहाजिरे, तीळ, काळी मिरी लवंग, नागकेशर, दालचिनी, स्टार फुल, जावेत्री, ४ मोठी वेलची, ७-८ तमालपत्र, खडा हिंग

कृती

कांदा-लसूण मसाला बनवताना त्यात कांदा आणि लसूण अधिक महत्वाचे साहित्य असते. त्यामुळे त्याचे प्रमाण जास्त घ्यावे लागते. आता कांदा -लसूण मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा पातळ चिरुन उन्हात वाळवून घ्या. यामुळे कांदा चांगल्याप्रकारे तळला जातो. याप्रकारे लाल मिरच्या देखील चांगल्या वाळून घ्या.

आता एक कढई तेल गरम करत ठेवा, तेल गरम होताच त्यात धणे, तीळ, शहाजिरे, खोबरं असे एक एक करुन भाजून मिक्सरमधून वाटून घ्या. यानंतर त्याच तेलाच्या कढईत काळी मिरी, लवंग, दालचिनी, स्टार फुल, जावेत्री, मोठी वेलची असे एक एक करुन तळून घ्या. थंड झाल्यानंतर हे साहित्य देखील एक एक करुन मिक्सरमध्ये वाटून घ्या. वरील सर्व साहित्य नीट भाजून वाटून घेतल्यानंतर एकजीव करा, आता त्यात खडा हिंगाची तळून बारीक केलेली पावडर टाका.

यानंतर लाल मिरच्या भाजून त्यात थोडे मीठ घालून मिक्सरमधून वाटून घ्या. आता त्याच तेलात कांदा, लसूण छान लाल होईपर्यंत तळून नंतर वाटून घ्या. आता हे सर्व भाजून – वाटून घेतलेल्या गोष्टी एकजीव करा. अशाप्रकारे तुमचा कांदा – लसून मसाला तयार आहे.

किचन किंग मसाला

साहित्य: १ टेबलस्पून हळद, जिरे, मोहरी, बडीशेप, चणाडाळ, खसखस ३ टेबलस्पून धणे, ४ हिरवी वेलची, १ मोठी वेलची, १ जावेत्री, ⅔ दालचिनी, २ स्टारफुल, ½ चमचा मेथी, ½ चमचा सुंठ पावडर, ८-१० काळीमिरी, लवंग, ¼ चमचा जायफळ पूड, ½ चमचा मीठ, २-३ तमालपत्र, लाल मिरच्या

कृती:

हळद, सुंठ पावडर वगळून जिरे, मोहरी, बडीशेप, चणाडाळ, खसखस, धणे, हिरवी वेलची, जावेत्री, लचिनी, स्टारफुल, मेथी, सुंठ पावडर, काळीमिरी, लवंग, चमचा जायफळ पूड, तमालपत्र, लाल मिरच्या हे सर्व साहित्य एक एक करुन चांगले भाजून घ्या. यानंतर हे साहित्य थंड होताच ते मिक्सरमधून वाटून घ्या. अशाप्रकारे तुमचा किचन किंग मसालाही तयार आहे.