Dal Vange : नेहमी नेहमी वांग्याची भाजी खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला वांग्याची एक हटके रेसिपी सांगणार आहोत. वांग्याची भाजी अनेकांना आवडते पण तुम्ही कधी डाळ वांगे खाल्ले आहेत का? तुरीच्या डाळीचा वापर करुन डाळ वांगे बनवले जातात. हे डाळ वांगे अत्यंत पौष्टिक आणि तितकेच टेस्टी असतात. डाळ वांगे कसे बनवायचे, यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.
साहित्य
- छोटी वांगी
- तूर डाळ
- टमाटर
- लाल मिरच्या
- फोडणीचं साहित्य
- गरम मसाला
- कोथिंबीर
- तेल
- मीठ
हेही वाचा : पालकांनो, मुलांना गोड खाण्याची आवड आहे, मग बनवा पौष्टिक गोड भात, ही सोपी रेसिपी नोट करा
कृती
- वांगी धुवून घ्यावी आणि
- वांगीच्या गोलाकार भागावर + या आकाराचा छेद करावा
- तुरीची डाळ अर्धा तास भिजवून ठेवावी
- एका भांड्यात तेल गरम करावे
- त्यात फोडणी घालावी
- त्यानंतर त्यात तुरीची डाळ टाकावी.
- डाळ चांगली परतल्यावर त्यात गरम मसाला आणि बारीक चिरलेले टमाटर टाकावे.
- चवीपुरतं मीठ टाकावं.
- त्यात वांगी टाकावी.
- डाळ वांगे शिजल्यानंतर सर्व्ह करण्यापूर्वी सुक्या लाल मिरच्यांचा तडका द्यावा आणि हा तडका डाळ वांगेवर टाकावा आणि वरुन कोथिंबीर टाकावी.