Diabetes Friendly Dosa Marathi Recipe: तुम्हाला माहित आहे का तुम्ही सकाळी उठून काय खाता यावर तुमच्या संपूर्ण दिवसाचा मूड कसा असणार हे ठरते त्यामुळे सकाळी केवळ पोट भरण्यासाठी नाही तर तुमचं मनही आनंदून जाईल यासाठी सुद्धा खायचे असते. नाष्ट्याला सकाळी मस्त लुसलुशीत डोसे किंवा जाळीदार घावण खाल्लं की पोट आणि मन दोन्ही तृप्त होतं. पण तांदळाचे डोसे हे प्रत्येकाला साजेसे ठरतील असं नाही. बहुतांश आजारात किंवा अगदी आपल्याला वजन कमी करायचं असल्यासही तांदूळ आहारातून कमी केला जातो. अशावेळी ज्वारी- नाचणी हा एक बेस्ट पर्याय ठरतो. आज आपण लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील ज्वारीच्या डोश्याची रेसिपी पाहुयात, चवीला आणि आरोग्याला गुणकारी असा हा डोसा तुम्हाला नक्कीच आवडेल, चला तर पाहुयात..
ज्वारीचा डोसा
साहित्य: उडीद डाळ १ कप, ज्वारी ३ वाट्या, बेकिंग पावडर चिमूटभर, तेल आवश्यकतेनुसार, मीठ, पाणी
कृती:
ज्वारी आणि उडीद डाळ कमीत कमी ६ तासांपर्यंत पाण्यात भिजत ठेवा, भिजवलेली ज्वारी व उडदाची डाळ वाटून घ्या. यामध्ये मीठ व बेकिंग पावडर टाकून मिश्रण रात्रभर आंबवण्यासाठु ठेवा हे मिश्रण आंबवून तयार झाल्यावर मंद आचेवर डोशाचा तवा गरम करायला ठेवा. या तव्यावर गरम तेल लावा, आणि डोशाचं मिश्रण ओतून पातळ पोळीसारखे पसरून घ्या. तुमच्या आवडीनुसार डोसा कुरकुरीत किंवा स्पॉंजी पद्धतीने शिजवून घ्या.
हे ही वाचा<< केळ्याच्या भाजीची खमंग कोकणी रेसिपी शिकून घ्या; पोळ्या- भात करण्याची कटकटच नाही
हा डोसा तुम्ही हलके तूप टाकून लसूण व हिरव्या मिरचीच्या सुक्या ठेच्यासह सर्व्ह करू शकता किंवा पुदिन्याच्या ओल्या चटणीसह सुद्धा याची चव आणखी लज्जतदार होऊ शकते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा आणि कशी होते नक्की कळवा.