How To Make Almond Cake : वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो. हा दिवस सजावट, केक, आवडीचे पदार्थ या गोष्टींमुळे आणखीन खास ठरतो. आजकाल तर अगदी माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत सगळ्यांचे वाढदिवस साजरे केले जात आहेत. तर नेहमी बेकारीतून, विकतचे केक आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी काही वेळात मऊसूत केक बनवू शकता. सोशल मीडियावर एका युजरने पूर्वी ओव्हन किंवा मार्केटमधून केक आणण्याचे क्रेझ नसताना कशाप्रकारे केक कुकरमध्ये बनवले जायचे हे दाखवलं आहे. तर आज आपण कुकरमध्ये बदामाचा केक कसा बनवायचा हे पाहूया…

साहित्य ( Almond Cake Ingredients) :

१/३ कप तूप

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

१/२ कप पिठी साखर

दोन चमचे घट्ट दही

१/४ कप बारीक ठेचलेले बदाम (बदाम पावडर)

३/४ कप गव्हाचे पीठ

१/२ चमचा बेकिंग पावडर

१/४ चमचा बेकिंग सोडा

१/३ कप दूध

सजावटीसाठी बदाम फ्लेक्स

बदाम इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स

हेही वाचा…Home Made Maggy: चटपटीत नाश्त्यासाठी बनवा गव्हाच्या पिठापासून मॅगी; लहान मुलं होतील खूश

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (How To Make Almond Cake) :

कुकरची शिट्टी आणि रबर रिंग काढा. त्यात स्टँड ठेवा. नंतर मीठ घाला आणि कुकर मध्यम ते उच्च आचेवर १० मिनिटे आधी गरम करा.

नंतर एका भांड्यात तूप, पिठी साखर, दही, बारीक ठेचलेले बदाम, गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दूध, बदाम इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स टाका.

तयार मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.

गरम करून घेतलेल्या कुकरमध्ये केक ठेवा आणि ३५ ते ४० मिनिटे बेक करा आणि मंद किंवा मध्यम आचेवर गॅस असावा.

टूथपिक वापरून केक तपासा आणि नंतर बाहेर काढा.

अशाप्रकारे बदामचा केक तयार

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @burrpet_by_dhruvijain या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

बदाम हे आरोग्यासाठी फायदेशीर ड्रायफ्रुट आहे. बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, त्यामुळेच बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते असेही म्हटले जाते. बदामामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जसे की व्हिटॅमिन-ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड इत्यादी. तर अनेक आरोग्यदायी फायद्यांनी भरपूर बदामाचा हा पौष्टीक केक नक्की घरी बनवून पाहा.

Story img Loader