Tandoori Roti In Pressure Cooker: जेव्हा आपण नॉर्थ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण ऑर्डर करतो तेव्हा आपल्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे पंजाबी स्टाईल दाल मखनी, बटर चिकन, शाही पनीर आणि त्यासोबत नान, रुमाली रोटी, लच्छा पराठा खाण्याची. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला सर्वात जास्त आवडते ते म्हणजे तंदूरमध्ये बनवलेल्या गरमागरम रोट्या. या रोट्या कुरकुरीत आणि आतून खूप मऊ असतात. त्यांच्यासोबत मस्त ग्रेव्ही खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण या रोट्या घरी तयार करण्याचा केला आहेत आहे. रोटी घरी करायची म्हणजे तुमची पहिली तक्रार असेल की तंदुर नाही. काळजी करू नका आम्ही तुमच्या समस्येवर जुगाड शोधला आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरातील प्रेशर कुकरच्या मदतीने तुम्ही ढाबा स्टाइलच्या तंदुरी रोट्या बनवू शकता आणि तेही झटपट. चला तर मग जाणून घेऊया ते बनवण्याची सोपी पद्धत कोणती आहे.

ढाबा स्टाईल तंदुरी रोटी रेसिपी

साहित्य

Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
paneer makana tikki recipe
पनीरची नवी रेसिपी ट्राय करायचीय? अवघ्या काही मिनिटांत करा ‘पनीर मखाना टिक्की’
Chicken tikka easy version recipe chicken starter easy recipe
Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Mumbai Street Style Masala Pav Easy recipe
मुंबई स्ट्रीट स्टाइल मसाला पाव, घरच्या घरी झटपट बनवा सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
  • एक वाटी गव्हाचे पीठ
  • अर्धी वाटी मैदा
  • अर्धा टीस्पून मीठ
  • थोडे तूप
  • मोठा प्रेशर कुकर
  • आवश्यकतेनुसार पाणी

अशी मळा कणीक
मैदा, पांढरे पीठ, मीठ एका मोठ्या भांड्यात घालून मिक्स करा. आता थोडे थोडे पाणी घालून मऊ कणीक मळून घ्या. हे कणीक चपातीच्या पिठापेक्षा मऊ आहे. मीठ घातल्याने चव चांगली येते. पीठ तयार झाल्यावर थोडावेळ झाकून अर्धा तास सोडा. नंतर ते एका प्लेटमध्ये काढून हातात थोडे तूप लावून पुन्हा चांगले मळून घ्या.

हेही वाचा – Crispy Potato: पावसाळ्यात नाष्ट्याला बनवा क्रिस्पी पोटॅटो स्नॅक्स; १० मिनिटांत तयार होते ही सोपी रेसिपी

प्रेशर कुकर कसा करावा गरम
पाच लिटर किंवा त्याहून मोठ्या आकाराचा कुकर घ्या. यामध्ये तुम्ही एकावेळी ४ ते ५ रोट्या सहज बनवू शकता. आता तुम्ही गॅस चालू करा आणि कुकरचे झाकण काढून तो गॅसवर उलटा करून २ मिनिटे मंद आचेवर ठेवा.

हेही वाचा – Pani Puri : पावसाळ्यात बाहेरची पाणी पुरी खाऊ नका; घरीच बनवा पाणी पुरी, ही सोपी रेसिपी नोट करा

अशा प्रकारे रोट्या तयार करा

  • जोपर्यंत कुकर गरम होत आहे, तोपर्यंत लहान आणि मध्यम आकाराचे गोळे बनवा, जेणेकरून एकाच वेळी अनेक रोट्या करता येतील.
  • आता हे गोळे कोरडे पीठ न लावता दाबून चपातीच्या आकारासारखे गोल बनवा. यासाठी तुम्ही हाताला तूप किंवा तेल लावू शकता. या रोट्या थोड्या जाड असतात.
  • अशा प्रकारे तुम्ही ४ रोट्या लाटून प्लेटमध्ये ठेवा. आता कुकरला गॅसवरून उचला आणि रोट्यांच्या एका बाजूला पाणी लावून त्याच्या आतील पृष्ठभागावर चिकटवत राहा.
  • गरम कुकरमुळे रोट्या सहज चिकटतील. नंतर गॅसवर कुकर उलटा ठेवून मध्यम आचेवर फिरवा.
  • थोड्या थोड्या वेळाने तपासत रहा की रोट्या जळत नाहीत. आता चिमट्याच्या मदतीने बाहेर काढा आणि तूप किंवा बटर लावून गरमागरम सर्व्ह करा.