Tandoori Roti In Pressure Cooker: जेव्हा आपण नॉर्थ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवण ऑर्डर करतो तेव्हा आपल्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे पंजाबी स्टाईल दाल मखनी, बटर चिकन, शाही पनीर आणि त्यासोबत नान, रुमाली रोटी, लच्छा पराठा खाण्याची. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला सर्वात जास्त आवडते ते म्हणजे तंदूरमध्ये बनवलेल्या गरमागरम रोट्या. या रोट्या कुरकुरीत आणि आतून खूप मऊ असतात. त्यांच्यासोबत मस्त ग्रेव्ही खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण या रोट्या घरी तयार करण्याचा केला आहेत आहे. रोटी घरी करायची म्हणजे तुमची पहिली तक्रार असेल की तंदुर नाही. काळजी करू नका आम्ही तुमच्या समस्येवर जुगाड शोधला आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरातील प्रेशर कुकरच्या मदतीने तुम्ही ढाबा स्टाइलच्या तंदुरी रोट्या बनवू शकता आणि तेही झटपट. चला तर मग जाणून घेऊया ते बनवण्याची सोपी पद्धत कोणती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा